Tuesday, October 30, 2007

आज-काल चे चहा-पोहे !!!

आज-काल सगळीकडे एकाच वि‍षय असतो..याचं लग्न ठरलं किंवा तीचं लग्न ठरलं..मग कधी ते love marriage असत तर कधी arrange marriage...

आज-काल मी देवाची प्रार्थना करत असतो की ’ देवा !!!! माझ्यावर चहा-पोहे ची वेळ नको रे ’... Officially flirting करण्याची मजा कितीही छान असली तरीही मी जेव्हा seriously विचार करतो तेव्हा मला चहा-पोहे म्हणजे problem असच वाटतं...त्याचं काय आहे की आज-काल जमाना बदलला आहे.. मुली ऐवजी मुलाने चहा-पोहे बनवण्याची वेळ सुद्धा येऊ शकते...

मुळातच आता चहा-पोहे ही concept जाऊन त्या ऐवजी CCD-Barista ची concept आली आहे...पुर्वी कसं मुला कडली सगळी प्रजा, प्रजा म्हणजे मुलगा, त्याचे आई-बाबा, एखादी कार्टी जी की त्या पोराची बहीण असते, एक मित्र जो की मुलीची बहीण किंवा मैत्रिण बघण्यात जास्त interested असतो झालच तर आजोबा-आज्जी, जमलच तर एखादा काका व मामा हे सगळे forms प्रजा...तर, पुर्वी कसं मुला कडली सगळी प्रजा मुलगी पाहणे या लढाई ला जायचे...मग तेथे ठरलेले "मुली गाऊन दाखव" किंवा " सगळा स्वयंपाक सुंदर बनवते ही" अशी वाक्य असायची..आता तो सगळा भुतकाळ..आज-काल फक्ता मुलगा आणि मुलगी भेटतात आणि या meetings CCD-Barista अशा ठीकणी होतात...

परवाच एक मित्र सांगत होता, " यार, ३०० रुपये गेले..जर मी एका महीन्यात १० मुली पहील्या तर ३००० रुपये तर असेच जातील... "

माझं डोक नको तेथे जरा जास्तच चालतं... त्याला म्हणालो," मित्रा, एक काम कर...पुढ्च्या वेळेस भेटीचे ठीकाण पर्वती किंवा चतुर्‍श्रुंगी ठरव...म्हणजे सुरुवातीलाच ऊंच चढायला लागल्याने पोरगी जरा थकेल आणि कमी बडबड करेल ( मुलांच्या अपेक्षा पण कीती माफक आणि भोळ्या-भाबड्या मनाने केलेल्या असतात ना ? ) ..मग तुच २-४ वाक्य सहजतेने टाकुन दे की ’CCD-Barista मध्ये गोंधळात भेट नको..नीट बोलण होत नाही’...वरुन हे पण सांग की ’ मला अशा शांत ठीकाणी यायला फार आवडतं ’.. " मला वाटत की निदान पहिल्या भेटी मध्ये तरी असली थाप खपून जाईल...तेथे एखादी भेळेची गाडी असेलच..सगळं बोलुन झाल्यावर मस्त पैकी १-२ भेळ गट्टम कर..मग बाजुच्या टपरी वरचा cutting मारायचा..पण तो मारता-मारता " Barista च्या coffee मध्ये ही मजा नाही " असा निदान दोन वेळेस तरी बोलायचं..पुर्ण भेटीच्या दरम्यान "मला साध्या गो‌ष्टी खुप आवडतात " हे वाक्य जास्तीत जास्त २ वेळेस आले पाहीजे..ऊगाचच एखाद्या हुशार पोरीला शंका यायची...५० रुपयात काम झालं की नाही दोस्ता ???

आज-काल बरेच जण s/w मध्ये कामं करतात...त्यामुळे प्रत्येक नविन मुलगी बघताना हीच वरची procedure "copy-paste" कशी करायची हे वेगळे सांगायला नको...

परवा कानावर नविनच गो‌‍ष्ट पडली...आज-काल onsite जाऊन आलेल्या मुलांचा भाव भलताच वाढला आहे म्हणे...पैसा वेगैरे सगळं सोडा हो...पण अशी मुलं खुप समजुतदार असतात म्हणे...ही पोरं दिवसा office मध्ये कामं करुन मग रात्री स्वयंपाक पण करु लागतात म्हणे..त्या नंतर भांडी पण घासतात म्हणे..weekend ला कपडे पण धुतात ...आणि येवढे सगळे करुन कायम ऊत्साही पण असतात म्हणे...यार... हे सगळं बोलणारा माणुस माझ्या समोर यावाच एकदा...नाही तर काय...मला आता भारतात परत जायची भीतीच वाटायला लागली आहे...!!!

Monday, October 15, 2007

Proposal Engineer

Cricket खेळण्याचा आणि माझा संबंध शाळेतच सुटला ... पण आज-काल जाणवायला लागले आहे की माझी अवस्था बरया पैकी cricketers सारखी झाली आहे..

मी proposal engineer आहे... नावावर जाऊ नका ...आमच्या field मध्ये तसेही propose करण्या सारखे interesting असे काही नसते..cricket मधल्या opener सारखी batting मी करतो...म्हणजे, कोणत्याही project ची सुरुवात ही proposal बनवण्या पासुनच असते..ती सुरुवात मी करतो...
जसे समोरच्या बाजुचे fast bower वेगाने मारा करतात तसा मी पण सगळे client चे त्यांच्या format मधले documents पहील्या १-२ दिवसात ( like first couple of overs ) सावध पणे वाचुन काढतो..आणि मग खेळ पुढे सुरु...

आज-काल मी बराच फ़ीरतो...Asia-Pacific support च्या नावाखाली माझे India-Singapore-Thailand-India असे चालु आहे जसे मुदखेड-मनमाड-पुणे-दौंड passanger...त्या Air-hostess ने फ़क्ता आता विमानाच्या दरवाज्यात " ओओओओओ मामा, तीच तुमाची कोपरयातली खिडकी " असं म्हणायचा बाकी आहे..पण मला वाटता की उपमा द्यायची म्हणला तर एका colony मढ्ये असणारया धुणे-भांडे करणारया एकाच बाई ची ऊपमा योग्य होइल ... प्रत्येक घरातली बाई तीला जसं आपल्याच घरातले काम आधी करुन जायला सांगते ना, त्यातला भाग आहे हा...किंवा मग cricket मधला १२वा गडी..पाणी म्हंटल की जातो पळत..gloves म्हंटल की जातो पळत..माझं असच आहे हो...
अस्सो....

कधी-कधी मला proposal बनवणे हे slog overs खेळल्या सारखे वाटते..तर कधी-कधी proposal म्हणजे power play...power play मध्ये कसं ५ overs मध्ये हाणामारी करुन घ्या..बसं तसच सांगतात मला.." ५ दिवस आहेत तुझ्याकडे..५ दिवसात proposal बनवुन टाक" ..proposal submit होऊन ३-४ दिवस होत नाहीत की तो पर्यंत दुसरा power play सुरु होतो..revision नावाचा..मग proposal revise करुन टाक..आणि या हाणामारीत माझी wicket पडून जाते..

Engineering Dept मधल्यां सारखे ६-६ महीने चालण्यारया project नावाची test match मला खेळायलाच मिळत नाही..pitch चा अंदाज घेत आरामात दिवस-दिवस खेळून मग century मारावी असं मला पण वाटत हो..पण काय करणार.. आमचा प्रकार म्हणजे सगळा २०-२० आहे..

कधी-कधी मला वाटत की माझा धोनी झाला आहे...world cup हरलो की घाला शिव्या..दिलेला plot परत मागतात..आणि २०-२० जिंकलो की लगेच "झारखंड रत्न"..तसच, एखादे proposal जर order मध्ये convert झाले तर लगेच appriciation..पण जर काहीही कारणाने order गेली तर लगेच proposal engineer ला मिळणारया facilities ची list वाचल्या जाते...

मला वाटत आहे की रवि शास्त्रि ला गुरु मानावा...जमतय तितके दिवस खेळुन घ्यावं..त्याच बरोबर बाकी options पण open ठेवावेत..तो commentry करतो, आपण consultancy करावी..ऊद्देष एकच, समोरच्या वर तोंड्सुख घ्यावं आणि त्यासाठी तीसरयाच कोणालातरी charge कराव..कसे ????