Thursday, December 11, 2008

शाळेतल्या परीक्षा !!!

शाळेतल्या परीक्षा आठवतात ??? माझ्या पोटात गोळा आला एकदम...
अहो येणारच... अरेरेरेरेरेरेरे....काय प्रश्न हो ते ?
कारणे द्या, कोण कोणस म्हणाले, संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या, ईसवीसन, भाषांतर, जोड्या लावा ..
असले हे हजार प्रकार...मला सांगा ... काय उपयोग हो ह्यांचा ??

’कोण कोणास म्हणाले’ ... याचे उत्तर म्हणजे, "अमुक-अमुक’ व्यक्ती तमुक - तमुक व्यक्तीला ’तेव्हा’ अशा शिव्या घालत होती..." असा प्रकार हा...
मला सांगा... कोणी कोणालाही काहीही म्हणो...आपल्याला काय करायचे आहे ?
कोणी सांगीतल्या आहेत चांभार चौकश्या ?आपण आपलं सरळ नाका समोरच्या रस्त्याने चालावं म्हणले ..तर...नाही... खुपसा नाक लोकांच्या बोलण्यात...
मी सांगतो, लहान वयात gossip करायची सवय लागते ना ... ती यामुळेच... :) :) :)

’कारणे द्या’... वाईट सवई लागतात हो यामुळे...
कार्टी घरात वकीली सुरु करतात...कहीही झाला की एकच..’ कारणे द्या"...
लहानपणी शाळेत ज्याना हा प्रकार छान जमतो ना...ती लोकं बहुदा मोठेपणी राजकारणी / नेते बनत असावीत..एकतर ’कारणे द्या’ यात ती expert असतात किंवा मग ’कारणे दाखवा’ असं म्हणुन मोकळी होतात..

’जोड्या लावा’... हा प्रकार मुळात ऎकतानाच ’काड्या लावा’ असा वाटतो... त्यामुळे असेल कदाचीत, पण त्यतल्या त्यात बरा वाटतो...
पण काय हो हे.... इथे २ गट असतात ना ? ...एका मध्ये ’लाला लजपत राय’ आणि दुसर्या गटा मध्ये ’सायमन गो बॅक’...???
डोक्याचा नुसता भुगा....परीक्षा प्रकार कसा interesting बनवावा ना...
आता, लाला लजपत राय आणि सायमन यांचा आज-काल च्या पोराना काय उपयोग ?
त्यामुळे जोड्या लावा प्रकारात काय करावं... एका गटात टाकावं अजय जडेजा, दुसर्या गटात टाकावं match fixing...एका गटात टाकावं करीना कपूर, दुसर्या गटात टाकावं सैफ़ अली खान...
पोरांच general knowledge कसं up-to-date राहील.. आणि...लहान जाऊ द्या, पण मोठ्यांचा interest पण टिकुन राहील.... :) :)
अरे बाप रे.... नको नको....
का गटात सलमान, अभिषेक आणि विवेक आले आणि दुसर्या गटात ऎश्वर्या आली तर ?..
बिचारी पोरं गोंधळुन जातील...त्या पेक्षा ’जोड्या लावा’ प्रकार पण नको....

’इसवीसन’... हा प्रकार तर प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला आहे ( म्हणजे तो फ़क्त पाचवीच्या परीक्षेत विचारल्या जातो असे नाही... )
हा प्रकार जरा अती होतो हो....इथे काल सकळी कोणती भाजी खाल्ली ते अठवायची बोंब असते तर मग तात्या टोपे कधी पळुन गेले हे कसे अठवणार हो ?
एक तर आपल्या आधीच्या लोकांनी धडमभार मारा-मार्या केल्या...तीतकेच तह केले ....
त्यांनी काहीही करायचे आणि आपण त्यांच्या तारखा लक्षाट ठेवत बसायचे...?
देवा....वाचव रे.....

आज-काल चे group D चे प्रश्न... " बागेची लांबी इतकी, रुंदी इतकी... मध्ये हिरवळ आहे..रस्ता आहे...त्याची लांबी-रुंदी....तर याचे क्षेत्रफ़ळ किती..आणि त्याचे ते किती ? "
नुसता बागेतला माळी करुन टाकला बघा पोरांचा....
group D चे प्रश्न जरा group D चे शोभतील असे तरी असावेत...मुलांना विचार करुन लिहायला लागले पाहीजे...
" निखिल चोप्रा याची cricket कारकिर्द " आढावा घ्या......किंवा मग.... " भोजपुरी cinema चे भारतीय सीनेस्रुष्टी मधले स्थान " विचार व्यक्त करा....
कसे ???

’गाळलेल्या जागा भरा’...
आता मला एक सांगा... "शहाजी हे शिवाजी च्या वडीलांचे ....... होते " या प्रश्नाचे उत्तर " शहाजी हे शिवाजी च्या वडीलांचे ’नाव’ होते " , हे कसे कळणार हो ???
किंवा आता हे बघा...
आमच्या ह्रुषीकेश ला परीक्षेत प्रश्न विचारला , " रोज सकळी .... लावुन अंघोळ करावी "
आमचा ह्रुषी इतका हुशार आहे ना.. त्याने नीट विचार केला आणि लिहीले , " रोज सकळी ’दरवाजा’ लावुन अंघोळ करावी"...
आता...’ दरवाजा लावुन ’ च्या ऎवजी ’ साबण लावुन’ अस उत्तर अपेक्षीत होतं त्याला ह्रुषी तरी काय करणार ???

एकंदरीत काय... तर...अशी ही आपली सर्वांची परीक्षा !!!

Wednesday, October 29, 2008

व्हॅलेनटाई’स डे !!!

आज असच सहज खुप पुर्वी लिहीलेले वाचत होतो आणि हे सापडले... माझं मलाच हसु आले... या बरोबरच बाकी सगळ्या गोष्टी पण एक-एक आठवल्या... शिल्पा इकडे आली आणि नंतर काय... धमालच धमाल.....
-------------------------------------------------------------------------------------------------

आज व्हॅलेनटाई’स डे ...बरीच वर्ष झाली...मी प्रत्येक वेळेस ठरवतो की आता पुरे झालं .. पुढच्या व्हॅलेनटाई’स डे ला मी एकाटाच देवदास सारखा नाही राहाणार...देवदास चे पण बरे होते हो...पारो च्या गम मध्ये त्याच्याकडे निदान चंद्रमुखी तरी होती...इथे तर सगळच उजेड आहे...

शाळेत असताना बरोबर सगळी पोरचं...मुलांची शाळा ना आमची...तेव्हा असलं काही घडणं शक्य पण नव्हतं..कोलेज सुरु झालं ..पण आम्ही मराठी माध्यमात शिकलेली पोरं...पोरगी म्हणलं की त-त-प-प... इंजिनेरींग सुरु होइ पर्यंत वेळ कधी गेली ते कळलच नाही...इंजिनेरींग मध्ये जरा कुठे मुलींकडे बघायला लागलो होतो...पण काय...जवळ जवळ सगळ्याच पोरी आधीच कोणीतरी लांबवल्या होत्या...!!! त्यामुळे आमचा व्हॅलेनटाई’स डे हा केवळ पिवळा गुलाब हातात घेऊन सकाळ ते संध्याकाळ तो कोणाला न देता फ़क्ता विचार करण्यातच जायचा... गाडी कधी रेड रोज कडे वळलीच नाही...मग पुढे काय...
नोकरी लागली पण छोकरी काही मिळाली नाही...!!!

गेले काही दिवस मात्र आयुश्यात एकदम गडबड उडाली आहे... कोणाच्या येण्याने इतका फ़रक पडतो असा मला कधी वाटला नव्हतं...

तीच्या बद्दल जर कोणी मला सांगायला सांगितले तर सांगताच येणार नाही मला...एकदम प्रशांत दामले अठवेल...’एका लग्नाची गोष्ट’ मधला..

"सर, तीचं वर्णन करताना शब्दांचे कसे आपसुख गाणे होते ..!!! "
ती परी....आस्मानीची....
ती परी....आस्मानीची....!!!

डोळे तीचे सळसळती माश्यांची जोडी...
ओठ तीचे रसरसत्या संत्र्याच्या फ़ोडी...
गालावर थरथरते साय दुधाची...
अंगावर चव झरते गोड मधाची...

ठरवलं...आज व्ही.डे. आहे...आज तीला सांगायचं... अगदी सगळं-सगळं सांगायचं...पण..पण काय पण काय....खाली डोका वर पाय...
तोंडातुन शब्दच बाहेर पडत नाहीत ना...मी एकदम नर्व्हस झालो...मनात बेचैनी वाढत होती...खोट-खोटं हसुन मी बेचैनी दाबत गेलो...

लंच साठी सगळे जमले...ती पण आली...माझ्या बाजुलाच बसली...मनात परत म्युझिक सुरु झाला...( ती परी....आस्मानीची....!!! )...
मी शांत-शांत होतो...ती एकदम अचानक, कोणाला ऐकु जाणार नाही अशा आवाजात म्हणाली, " मी या टेबल खाली तुझा हात पकडला तर कोणाला दिसेल का ? "...

मी तीच्याकडे बघतच राहीलो...माझी विकेट या गुगली मुळे कधी ऊडाली मला कळलेच नाही...तीच्या चेहर्यावर तेच सुंदर हास्य...तीचे ते वाक्य म्हणजे माझं व्हॅलेनटाई’स गिफ़्ट होतं...She made my day !!!

तीला गिफ़्ट काय द्याव याचा विचार तर केव्हा पासुन करत होतो...कहीतरी priceless असं तीला द्यायचं होतं...काय फ़क्त तेचं कळत नव्हतं...
आता विचार करत आहे की एक गिफ़्ट ribbon घेऊन येतो...स्वतःच्या भोवती अडकवतो...आणि तीच्या समोर जाऊन उभा राहातो...

आवडेल का तीला ???

Wednesday, August 13, 2008

Engagement Special !!!!

Engagement Day..... !!!
खुप दिवस वाट पाहात होतो आम्ही ..... खुप जास्त excitement... खुप सारे plans... खुप सारी shopping....
येणार-येणार म्हणता-म्हणता तो दिवस आला आणि गडबडीत कधी संपला कळले पण नाही... सगळी कडे आनंद, हसणे आणि समाधान अशा स्वरुपाचा तो दिवस होता..

दुसर्या दिवशी सकाळी माझ्या भाऊजींनी मला विचारले " कसे वाटले engagement होताना ?"
मी पट्कन म्हणालो, " अहो, किती गडबड झाली...काही कळलच नाही हो..."
भाऊजींन साठी तर ही half volley होती....
" बाबा रे, सगळ्याच मुलांच असच होतं... काहीच कळत नाही... आणि जेव्हा कळतं, तेव्हा खुप ऊशीर झालेला असतो... हे हे हे "....
भाऊजींनी लगेच sixer मारला होता....

आज-काल मला प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो, " Engagement झाल्यावर कसं वाटतं ? "

एक तर आमच्या madam US मध्ये आहेत.. मी इथे Singapore मध्ये आहे..
माझा ३ वर्षाचा भाचा हो.... तो पण काही कमी नाही .....
मला phone वर विचारतो, " मामा, करमतयं का ? " ( मी इथेच चाट पडलो... )
मी म्हणलो, " नाही रे.... "
तर मग हा म्हणतो, " हो...होतं असं... " मी गप्पच..... [ पलीकडे speaker phone चालु आहे...आणि सगळ्यांचा हसण्याचा आवाज मला ऎकायला येत आहे :) :) :) ]
अरे...... तुझं वय किती... तु बोलतो किती....

आमच्या madam तीकडे आहेत म्हणल्यावर सगळे जण लयं प्रश्न विचारतात
" काय मग.. तु पण तीकडे job शोधणार का?"
" काय.. तु पण आता तीकडेच पुढे शिकुन घे... "

लोकांना माणसाचे सुख बघवत नाही का हो ??? खर तर कीती सुंदर विचार आहेत मझ्या डोक्यात...
Dependant visa वर तीकडे जावे...
बायकोला अभ्यास / नोकरी असे सर्व तीचे व्याप करु द्यावेत...
मी पुर्ण घर सांभाळीन ...स्वयंपाक , धुणी / भांडी मी सगळं बघुन घेइन...
बायकोला car घेउ देत...
मी त्याच car मधुन तीला office ला सोडायला/आणायला जाइन... [ मधल्या वेळात त्याच car मधुन मस्त उंडारुन येइन.. :) ]
तीला काय हव-नको ते जातीने लक्ष देउन बघेन... किती मदत होइल तीला माझी... :) :) :)
हे सगळं सोडुन माझ्या मागे अभ्यास आणि job चा त्रास लावण्यात लोकाना काय आनंद मिळतो ????

आता खरं सांगु का ?
Engagement झाल्यावर खुप छान वाटतं...
या सगळ्या भावना शब्दात व्यक्त करणं कदाचीत मला कधीच जमणार नाही...पण....खुप जास्त छान वाटतं इतका मात्र नक्की....
आयुष्यात आपल्या बरोबर होऊ शकणार्या खुप सुंदर व सुखद गोष्टींपैकी ही एक महत्वाची हे मी नक्कीच म्हणु शकेन.... !!!!

Monday, June 30, 2008

अब क्या कहें !!!

कीस्सा त्या दिवसांतला आहे की आम्हा सर्व मित्रांना engineering नंतर पुण्यात नोकरी मिळाली व आम्ही सर्व जण पुण्यात भाड्याने घर घेऊन राहायला लागलो... नविन नोकरी, घरा पासून दुर, सगळे मित्र .. मग काय, काही विचारायलाच नको...मस्त मजा चालु होती... अगदी छान bachelor's life जगत होतो आम्ही सगळे...सहाजीकच प्रत्येक जण हा खुद की मर्जी का मालीक... त्यामुळे घरामध्ये हवं तस रहाणे, हव्या तेथे गोष्टी टाकणे, हवा तसा पसारा करणे यात काही नविन नव्हते... अचानक कोणाच्यातरी बावळट डोक्यात घर स्वछ ठेवण्याची कल्पना आली... "घर" हे "घर" वाटले पाहीजे असे आमच्या घार ( घारपुरे ) चे म्हणणे होते... अचानक घरात कपाटे आली...मग पडदे आले...झाडु व्यवस्थित मारल्या जायला लागला... आणि घार च्या डोक्यात एक प्रश्ण आला ...

" आपण इथे घर म्हणुन राहातो... सर्व गोष्टी घरच्या सारख्या करतो...तर मग आपल्या bathroom मध्ये प्रत्येकाचा वेगळा साबण कशाला ??? "

सगळे जण हैराण झालो...घार काही केल्या ऐकत नव्हता... अथक परीश्रम करुन सर्वांनी मिळुन त्याचे म्हणणे हाणुन पाडले..

शांत आवाजात घार म्हणाला " आता मला कळलं की आपल्या घराला घरपण का येत नाही " :) :) :)

-------------------------------------------------------------------------------------------------

दिवस तेव्हाचे होते जेव्हा mobile हा प्रकार बर्या पैकी नविन होता... incoming call साठी पण पैसे पडायचे...मी honeywell मध्ये होतो त्या वेळेस... अचानक आमच्या आई च्या डोक्यात कुठुन तरी आले की मला mobile पाहीजे... आई ला विचारले की, " अगं कशाला ? तु घरीच असतेस ... landline आहेच...उगाच सांभाळण्याची कटकट होइल..".... पण नाही....

मी आई ला mobile दिला...

त्या नंतर १-२ दिवसां नंतर , दुपारची वेळ होती...मी एका meeting मध्ये होतो... मला एक खुप महत्वाचे presentation द्यायचे होते... आमच्या BU चे head पण meeting मध्ये होते... मी presentation देण्या साठी उभा राहणार तेव्हद्यात माझा mobile vibrate झाला...

" Aai calling... " आणि लगेच call बंद झाला...

आई ने आत्त्ता का call केला ?... काय झालं ??....phone का बंद केला ???

मी पटकन "excuse me" म्हणुन बाहेर आलो आणि desk पर्यंत न जाता लगेच mobile वरुन आई ला call केला... आई ने phone ऊचलला...

" ये ये ये .... तुला काय वाटल ? तुला एकट्यालाच मित्रां बरोबर missed call-missed call खेळता येते ?? मी तुझा call उचलला... "

आता काय बोलणार ?? :) :) :)
-------------------------------------------------------------------------------------------------

माझ्या आई चे एक मामा आहेत... रमेश मामा... आई चे मामा असले तरीही आम्ही सगळे पण त्यांना प्रेमाने रमेश मामाच म्हणतो...

या गोष्टीला पण आता खुप वर्ष झाली... रमेश मामा एकदा hair dye विकत घ्यायला दुकानात शिरले...

रमेश मामा , " hair dye पाहीजे "

दुकानदार , " कोणत्या brand चा पाहीजे ? "

रमेश मामा , " Godrej चा द्या "

दुकानदाराने एक box समोर ठेवला..

रमेश मामा , " हा केव्हद्याला ? "

दुकनदार , " ७५ रुपये"

रमेश मामा , " बाप रे..... म्हणजे गड आला पण सिंव्ह गेला ना ... "

दुकानदार बुचकळ्यात पडला , " म्हणजे ??.... मी समजलो नाही साहेब .. "

रमेश मामा , " अहो.. केस तर काळे झाले...पण डोळे पांढरे झाले ना ... "

:) :) :)
-------------------------------------------------------------------------------------------------

Monday, June 2, 2008

What a day !!!!

काही काही गोष्टी आपल्याला कधी आणि का आठवतात हे सांगता येत नाही...आज जवळ-जवळ ४ वर्ष झाली या गोष्टीला, पण सगळ आजुन नजरे समोर तसच आहे...

मला आजुन नोकरी मिळाली नव्हती...पण खुप प्रयत्नां नंतर Honeywell मधुन interview चा call आला होता...interview सोमवारी होता आणि मधे ३-४ दिवस होते म्हणुन मी मित्रांच्या बरोबर घरी औरंगाबादला गेलो होतो...माझे मित्र आधिच पुण्यात नोकरी करत होते आणि मी त्यांच्याच बरोबर भाड्याने घर घेउन पुण्यात राहात होतो...हे माझे मित्र weekend साठी घरी आले की मग रविवारी रात्री १२ च्या बसने पुण्याला परत जायचे...या वेळेस पण तसच ठरवल होता...या बसला गर्दी असते म्हणुन नेहमी प्रमाणे reservation पण केले होते... मी, अमित आणि स्वप्निल...२६, २७, २८..." काय यार...इतक्या मागे... " असं नाक मुरडतच आम्ही booking केले होते...

reservation केलेले असल्यावर १२ च्या गाडीला १२ ला २ मिन कमी असताना तीथे जाउन बसलेल्या माणसाला उठवण्यात मजा येते ना... ( आम्ही खरच hopeless होतो )..बस मध्ये पाय ठेउन पाहीले तर २६, २७, २८ सोडुन पुर्ण बस भरलेली होती...बसच्या खाली पण खुप जास्त गर्दी होती..." पोपट झाला यार" असे म्हणत आमच्या जागेवर गेलो...तेथे त्या जागेवर एक bag ठेवली होती जी आम्ही उचालुन खाली थेवली आणि जागेवर बसलो...

२-३ मिन नंतर एक मणुस चढला व त्याने पाहीले की आपली जागा गेली...त्याला राग आला.. " reservation केले तर मग वेळेवर येता येत नाही का... स्वतःला समजता काय...माझी bag कोणी फेकली "...असे त्याने सुरु केले....आम्ही त्याला समजाऊन सांगण्याचा प्रयत्ना केला की bag फेकली नाही तर ठेवली आहे...तर मग त्याने सगळ्यां समोर आई-बहीणी वरुन शिव्या द्यायला सुरुवात केली... ते इतका घाण वाटत होत म्हणून मी त्याच्याकडे एक तुछ्ह कटाक्ष टाकला आणि खिडकीतुन बाहेर बघायला लागलो... " काय रे ढापण्या.. काय बघतोस ? " असा आवाज कानावर पडला म्हणुन तीकडे बघायला गेलो तर तीतक्यात त्या मणसाचा हात माझ्या चेहरयाच्या इतक्या जवळुन फीरला आणि केवळ माझ्या चष्म्याला त्याचे बोट लागुन चष्मा खाली पडला. मला कळलेच नाही काय झाले ते. मी चष्मा उचलला, डोळ्यावर चढवला..आणि दुसरया क्षणाला माझ्या हाताची पाच बोटे त्या माणसाच्या डाव्या गालावर उमटली होती.. कसे घडले , काय घडले माहीत नाही.. पण तो feel आजुन पण माझ्या हातांवर मला जाणवतो...तो माणुस चीडला पण तो काही बोलणार तीतक्यात लोक मध्ये पडले आणि त्याला बस मधुन खाली उतरवले...

पहाटे पुण्यात पोहोचलो...एक पण auto वाला meter प्रमाणे कोथरुड ला यायला तयार नाही.. दिडपट तर सोडा पण ८० रु. च्या खाली कोणी बोलायला पण तयार नाही..काय करणार..अडला हरी गाढवाचे पाय धरी...

सकाळी ९ वाजता निघताना अमोल चा shirt घातला कारण तो मझ्यावर छान दिसत होता...honeywell मध्ये पोहोचलो आणि पाहीले तर शर्ट ला लावलेल्या पेन मधुन शाई निघुन सगळा खिसा निळा झाला होता..

तसाच आत गेलो...receiption च्या तिथे बसलो...honeywell ची चमक-धमक बघत होतो मी...थोड्या वेळाने एक ताई आल्या आणि मला एका desk वर बसायला सांगितले...मग एक paper हातात दिला आणि म्हणे की हा apptitude चा paper सोडव...कधी नव्हे ते chance मिळाला होता...धपाधप १० च्या १० प्रश्ना सोडवुन टाकले...मस्त वाटत होतं एकदम...लगेच मी स्वतःला एका cubical मध्ये काम करण्याची स्वप्ने पण बघायला लागलो...

तेव्ह्ड्यात " This is the technical test paper" अस म्हणत त्या ताई ने स्वप्नं मोडले...written tech test paper ???....हे तर मला माहीतच नव्हते...माझी दांडी तीथेच गुल झाली...Engineering ची ४ वर्षे काय गोट्या खेळल्या का असा प्रश्न पडला कारण १ पण उत्तर येत नव्हते... मग लक्षात आले की paper हा instrumentation engineering चा आहे... त्या ताई ना बोलावुन सांगितले की मी instru नसुन electronics & tele-comm engineer आहे...

" तु instru engineer नाहीस ? " ताई
" नाही" मी म्हणलो
" मग इथे काय करत आहेस ? " ताई
" तुम्हीच बोलावले ".. मी

ती तीच्या साहेबांशी खुसुर-फ़ुसुर करुन आली आणि म्हणाली की तुला चुकुन interview चा call दिला...

माझ्या background मध्ये लगेच ’ दिल के अरमान आसुंओ में बेह गये " असं गाणं सुरु झालं... लगेच स्वप्नातला मी bag pack करुन company बाहेर निघतोय असे दिसायला लगले...

तेव्हड्यात त्या ताई ने मला आजुन एक कागद आणुन दिला आणि म्हणे " never mind... हा electronics चा paper आहे...हा सोडव " ...मी बिचारा...paper पहीला...येत तर काहीच नव्हते... मार-मार तुक्के मारले... शेवटी ५० पैकी ८ मिळाले...म्हंटल बोंबला....

त्या ताई ने सांगितले की आता आपण निघा...काही आसेल तर आम्ही कळवतो...किती प्रेमाने नकार होता ना तो ??? मझा "हनिऊ" झाला होता... हनिऊ म्हणजे हताश, निराश, ऊदास...

६ वजता gate च्या बाहेर आलो आणि माझी bike मला सापडेना...खुप शोधुन पण काही उपयोग झाला नाही...१० मिन नंतर लक्षात आले की bike चोरीला गेली आहे....हात पायच गळाले...तसाच आत गेलो...त्या ताई च्या साहेबाना सांगितले...ते मझ्या बरोबर बाहेर आले... " असेल रे इथेच कुथेतरी" असे ते म्हणत होते....

५ मिन इकडे-तीकडे पाहीले आणि कोपरया कडे हात दाखवुन ते म्हणाले " ते बघ "...मी इकदम आशेने तीकदे पाहीले..." त्या तीथे रीक्षा मीळेल "....मला काही कळालेच नाही....च्यायला...ते काका पक्के पुणेरी असले पाहीजेत....

मी रीक्षा करुन police station गाठल ... ते लोक FIR घ्यायला तयार नाही... २ दिवसाने बघु गाडी नाही मिळली तर असे म्हणुन ते पानाच्या टपरी कडे पसार पण झाले...मी आपला हडपसर च्या bus stop वर येऊन उभा राहीलो...

कोथरुड ला पोहोंचे पर्यंत दिड तास मी फ़क्त एकच विचार करत होतो की " बस्स झालं...आता call centre join करायचे... ५ महीन्यात ५० हजार कमवायचे ... नविन गाडी घ्यायची मगच औरंगाबाद ला जायचे....

इतका वाईट दिवस गेला तरीही भुक तर लागतेच...डब्बा यायचा आमच्या कडे...अमोल ने डब्बा उघडला आणि म्हणाला.... " व्वा....... पुरण पोळी..."

मला हसावे का रडावे तेच कळत नव्हते.... !!!!

Monday, April 7, 2008

जय Optimism ..!!!!

माणसाने नेहेमी optimistic असावे...आणि कोणीही काहीही म्हणले तरीही आपल्याला स्वतःला हवे ते करता आले म्हणजे झाले... अस वागण्याच मी ठरवून बघितल .. दुनियाच पालटते राव...


सोमवारी सकाळी मी दीर्घ मुदतीच्या तापातुन उठल्या सारखा दिसायाचो...किंवा मग बघणाऱ्याला वाटायचे की रात्रीची जरा जास्तच झाली आहे, उतरायला जरा वेळ लागेल... खरच सांगतो आमच्या औरंगाबाद च्या त्या बाजुच्या सुंदर पोरीच्या कुत्र्याला किंवा त्या कुत्र्याच्या मालकाला मी जीतका घाबरत नाही त्यापेक्षा जास्त मी सोमवार ला घाबरायचो...पण आता..छेछेछेछेछेछे...... आता..जय Optimism ..सोमवारी सकाळी मी म्हणतो की जो दिवस चालु आहे तो नाही count करायचा...झाला , एक दिवस कटला...फ़क्ता ४ दिवस राहीले...आणि मग weekend...yeeeeeeeeee.....friday तर काय, weekend mood असतो...तो पण नको count करायला...आजुन एक दिवस कटला...बस्स...तीनच दिवस राहीले...wow... एकदम मस्त वाटायला लागलं...जय Optimism ..


मिळणारा पगार कधी कोणाला पुरला आहे का ? bank मध्ये जमा कधी होतो, कधी संपतो कळत पण नाही...कधी-कधी डोकं खाजवुन अठवावं लागतं की खरच या महीन्यात मिळाला होता ना ? पण आता... Optimism आहे ना... महीन्याच्या २ तारखेला पण मी हसत-हसत म्हणतो " यार .. पैसे संपले तर संपले..just 28 more days to go ".. आणि मग लहान बाळ कसं आई ने भरवताना चिऊ-काऊ चा घास म्हणलं की पटापट खातं, तसं माझे २८, २७, २६ म्हणत दिवस पटापट संपतात..जय Optimism ..


या "Click" शब्दाची तर ऐशी की तैशी..कुठे-कुठे वापरल्या जातो हा शब्द ? फोटो काढताना ठीक आहे..पण मुलगा / मुलगी बघताना ??? परवा माझा मित्र नाराज होऊन बसला होता..का तर मुलगी त्याला म्हणाली की तो तीला "click" नाही झाला...आणि वर तीला हे पण माहीत नाही की "click" होणं म्हणजे exact काय...अशा वेळेस काढावं आपल शस्त्र ... जय Optimism .. तीला म्हणावं " लय भारी - तुझ्या घरी "... लगेच ’रंगीला’ मधला मुन्ना आठवायचा " Bus, Train और लडकी... इन तीनोके पीछे कभी नही भागनेका...एक जाती है, तो दुसरी आती है !!! "


एकंदरीत काय तर....जय Optimism ..!!!!