Monday, April 7, 2008

जय Optimism ..!!!!

माणसाने नेहेमी optimistic असावे...आणि कोणीही काहीही म्हणले तरीही आपल्याला स्वतःला हवे ते करता आले म्हणजे झाले... अस वागण्याच मी ठरवून बघितल .. दुनियाच पालटते राव...


सोमवारी सकाळी मी दीर्घ मुदतीच्या तापातुन उठल्या सारखा दिसायाचो...किंवा मग बघणाऱ्याला वाटायचे की रात्रीची जरा जास्तच झाली आहे, उतरायला जरा वेळ लागेल... खरच सांगतो आमच्या औरंगाबाद च्या त्या बाजुच्या सुंदर पोरीच्या कुत्र्याला किंवा त्या कुत्र्याच्या मालकाला मी जीतका घाबरत नाही त्यापेक्षा जास्त मी सोमवार ला घाबरायचो...पण आता..छेछेछेछेछेछे...... आता..जय Optimism ..सोमवारी सकाळी मी म्हणतो की जो दिवस चालु आहे तो नाही count करायचा...झाला , एक दिवस कटला...फ़क्ता ४ दिवस राहीले...आणि मग weekend...yeeeeeeeeee.....friday तर काय, weekend mood असतो...तो पण नको count करायला...आजुन एक दिवस कटला...बस्स...तीनच दिवस राहीले...wow... एकदम मस्त वाटायला लागलं...जय Optimism ..


मिळणारा पगार कधी कोणाला पुरला आहे का ? bank मध्ये जमा कधी होतो, कधी संपतो कळत पण नाही...कधी-कधी डोकं खाजवुन अठवावं लागतं की खरच या महीन्यात मिळाला होता ना ? पण आता... Optimism आहे ना... महीन्याच्या २ तारखेला पण मी हसत-हसत म्हणतो " यार .. पैसे संपले तर संपले..just 28 more days to go ".. आणि मग लहान बाळ कसं आई ने भरवताना चिऊ-काऊ चा घास म्हणलं की पटापट खातं, तसं माझे २८, २७, २६ म्हणत दिवस पटापट संपतात..जय Optimism ..


या "Click" शब्दाची तर ऐशी की तैशी..कुठे-कुठे वापरल्या जातो हा शब्द ? फोटो काढताना ठीक आहे..पण मुलगा / मुलगी बघताना ??? परवा माझा मित्र नाराज होऊन बसला होता..का तर मुलगी त्याला म्हणाली की तो तीला "click" नाही झाला...आणि वर तीला हे पण माहीत नाही की "click" होणं म्हणजे exact काय...अशा वेळेस काढावं आपल शस्त्र ... जय Optimism .. तीला म्हणावं " लय भारी - तुझ्या घरी "... लगेच ’रंगीला’ मधला मुन्ना आठवायचा " Bus, Train और लडकी... इन तीनोके पीछे कभी नही भागनेका...एक जाती है, तो दुसरी आती है !!! "


एकंदरीत काय तर....जय Optimism ..!!!!