Thursday, December 11, 2008

शाळेतल्या परीक्षा !!!

शाळेतल्या परीक्षा आठवतात ??? माझ्या पोटात गोळा आला एकदम...
अहो येणारच... अरेरेरेरेरेरेरे....काय प्रश्न हो ते ?
कारणे द्या, कोण कोणस म्हणाले, संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या, ईसवीसन, भाषांतर, जोड्या लावा ..
असले हे हजार प्रकार...मला सांगा ... काय उपयोग हो ह्यांचा ??

’कोण कोणास म्हणाले’ ... याचे उत्तर म्हणजे, "अमुक-अमुक’ व्यक्ती तमुक - तमुक व्यक्तीला ’तेव्हा’ अशा शिव्या घालत होती..." असा प्रकार हा...
मला सांगा... कोणी कोणालाही काहीही म्हणो...आपल्याला काय करायचे आहे ?
कोणी सांगीतल्या आहेत चांभार चौकश्या ?आपण आपलं सरळ नाका समोरच्या रस्त्याने चालावं म्हणले ..तर...नाही... खुपसा नाक लोकांच्या बोलण्यात...
मी सांगतो, लहान वयात gossip करायची सवय लागते ना ... ती यामुळेच... :) :) :)

’कारणे द्या’... वाईट सवई लागतात हो यामुळे...
कार्टी घरात वकीली सुरु करतात...कहीही झाला की एकच..’ कारणे द्या"...
लहानपणी शाळेत ज्याना हा प्रकार छान जमतो ना...ती लोकं बहुदा मोठेपणी राजकारणी / नेते बनत असावीत..एकतर ’कारणे द्या’ यात ती expert असतात किंवा मग ’कारणे दाखवा’ असं म्हणुन मोकळी होतात..

’जोड्या लावा’... हा प्रकार मुळात ऎकतानाच ’काड्या लावा’ असा वाटतो... त्यामुळे असेल कदाचीत, पण त्यतल्या त्यात बरा वाटतो...
पण काय हो हे.... इथे २ गट असतात ना ? ...एका मध्ये ’लाला लजपत राय’ आणि दुसर्या गटा मध्ये ’सायमन गो बॅक’...???
डोक्याचा नुसता भुगा....परीक्षा प्रकार कसा interesting बनवावा ना...
आता, लाला लजपत राय आणि सायमन यांचा आज-काल च्या पोराना काय उपयोग ?
त्यामुळे जोड्या लावा प्रकारात काय करावं... एका गटात टाकावं अजय जडेजा, दुसर्या गटात टाकावं match fixing...एका गटात टाकावं करीना कपूर, दुसर्या गटात टाकावं सैफ़ अली खान...
पोरांच general knowledge कसं up-to-date राहील.. आणि...लहान जाऊ द्या, पण मोठ्यांचा interest पण टिकुन राहील.... :) :)
अरे बाप रे.... नको नको....
का गटात सलमान, अभिषेक आणि विवेक आले आणि दुसर्या गटात ऎश्वर्या आली तर ?..
बिचारी पोरं गोंधळुन जातील...त्या पेक्षा ’जोड्या लावा’ प्रकार पण नको....

’इसवीसन’... हा प्रकार तर प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला आहे ( म्हणजे तो फ़क्त पाचवीच्या परीक्षेत विचारल्या जातो असे नाही... )
हा प्रकार जरा अती होतो हो....इथे काल सकळी कोणती भाजी खाल्ली ते अठवायची बोंब असते तर मग तात्या टोपे कधी पळुन गेले हे कसे अठवणार हो ?
एक तर आपल्या आधीच्या लोकांनी धडमभार मारा-मार्या केल्या...तीतकेच तह केले ....
त्यांनी काहीही करायचे आणि आपण त्यांच्या तारखा लक्षाट ठेवत बसायचे...?
देवा....वाचव रे.....

आज-काल चे group D चे प्रश्न... " बागेची लांबी इतकी, रुंदी इतकी... मध्ये हिरवळ आहे..रस्ता आहे...त्याची लांबी-रुंदी....तर याचे क्षेत्रफ़ळ किती..आणि त्याचे ते किती ? "
नुसता बागेतला माळी करुन टाकला बघा पोरांचा....
group D चे प्रश्न जरा group D चे शोभतील असे तरी असावेत...मुलांना विचार करुन लिहायला लागले पाहीजे...
" निखिल चोप्रा याची cricket कारकिर्द " आढावा घ्या......किंवा मग.... " भोजपुरी cinema चे भारतीय सीनेस्रुष्टी मधले स्थान " विचार व्यक्त करा....
कसे ???

’गाळलेल्या जागा भरा’...
आता मला एक सांगा... "शहाजी हे शिवाजी च्या वडीलांचे ....... होते " या प्रश्नाचे उत्तर " शहाजी हे शिवाजी च्या वडीलांचे ’नाव’ होते " , हे कसे कळणार हो ???
किंवा आता हे बघा...
आमच्या ह्रुषीकेश ला परीक्षेत प्रश्न विचारला , " रोज सकळी .... लावुन अंघोळ करावी "
आमचा ह्रुषी इतका हुशार आहे ना.. त्याने नीट विचार केला आणि लिहीले , " रोज सकळी ’दरवाजा’ लावुन अंघोळ करावी"...
आता...’ दरवाजा लावुन ’ च्या ऎवजी ’ साबण लावुन’ अस उत्तर अपेक्षीत होतं त्याला ह्रुषी तरी काय करणार ???

एकंदरीत काय... तर...अशी ही आपली सर्वांची परीक्षा !!!