Wednesday, January 28, 2009

Mazi Doordrushti !!!

काल रात्री झोपायला जरा उशिर झाला...( हे काय सांगतोय मी ??? ... रोज रात्री laptop वर एक नाटक किंवा सिनेमा अस गणित असल्यावर ऊशिर तर होणारच ना... ) .. तर सांगायचा मुद्दा काय की यामुळे उठायला पण जरा ऊशिरच झाला... जरा म्हणजे...साडे नऊ वाजले...

" अरे बा.ss.प रे...बोंबला...".अस म्हणत उठलो...पटापट पटापट आवरुन सव्वा दहा ला touch...साहेब लोकांना / ओळखीच्यांना दिसणार नाही असे दरवाजे वापरुन माझ्या जागेवर येउन बसलो...कानोसा घेतला..सर्वत्र शांतता... हुश्श म्हणुन laptop सुरु केला...mail check करुन झाले...एक तासाभराने लक्षात आले की दीड-दोन तास मी office मध्ये नव्हतो आणि कोणाला काही कळलेच नाही...कोणाला काही फ़रक पण पडला नाही...

आई शप्पथ ...मी पुर्ण दिवस जरी office ला नसतो आलो तर.. :) :) :)... तरी.... कोणाला काही कळले पण नसते... :) :) :).... माझा boss ??? मुळातच sales च्या लोकांना हा फ़ायदा...माझा boss हा फ़क्त अमावस्या / पौर्णिमा किंवा दसरा/दिवाळी असाच दर्शन देतो... ( singapore मध्ये असल्यामुळे दसरा/दिवाळी च्या ऐवजी chinese new year / हरीराया असे म्हणावे लागेल :) )... दुपारी तीन नंतर माझ्या boss ला office मध्ये दाखवा आणि १०००$ मिळवा असे मी जाहीर केले असते हो...पण त्याच्या साठी १०००$... ???... जाऊ दे....

माझ्या मनात विचार आला... तसाही माझा साहेब माझ्याशी email किंवा phone वर बोलतो... मग...मी कशाला झक मारायला office मध्ये येत आहे ??? घर तसेही office पासून ५ मिन च्या आंतरावर आहे...अचानक meeting जरी बोलावली तरी "आलो sss०००००००" असं म्हणत ५ मिन मध्ये पोहोचता येइल...
" छे .... ऊगाच एक वर्ष वाया घालवलं " ( हे अगदी प्रशांत दामले style )... :) :) :)

आता मात्र नको ते डोके चालायला लागले आहे....
नाही..नाही...... फ़रक तर पडला पाहीजे...
मी १० मिन जरी नसलो तरी फ़रक पडला पाहीजे...
काम नसेल तर ऊगाच meeting call करुन २-४ तास तोंडाची वाफ़ दवडलीच पाहीजे...
बाकी काही issue नसतील तर quality / improvement चे issue करुन आपला झेंडा फ़डकवलाच पाहीजे...
काहीच नाही झाला तर निदान time management / discipline यावर तर भाषण ठोकलच पाहीजे...
नाही तर काय....

अहो...recession आहे सध्या...
गुलाबी पावती मिळण्यापेक्षा हे वरचे केव्हाही चांगले नाही का ?
अहो..कोणाचा काय भरोसा... काहीच नाही केले म्हणुन मानाचा नारळ आपल्यालाच मिळायचा...

डोळ्यां समोर एकदम ’ हम है राही प्यार के ’ मधला अमिर खान आला ... गाणं पण कोणतं तर...
" हम हुवे बरबाद ..अब तो.. हम हुवे बरबाद..
तुम रहो आबाद... अब तो..तुम रहो आबाद "

आई ला..... आपले असे झाले तर ???
आता आज दुपारी मला रोज येते तशी office मधली झोप काही येणार नाही..... !!!