Tuesday, September 8, 2009

हींदी सिनेमा : माझी कारकीर्द

शिरीश कणेकर यांनी सांगीतल्या प्रमाणेच हींदी सिनेमा बघण्याची माझी कारकीर्द "प्रदिर्घ" आहे...गेल्या २-३ वर्षां मध्ये तर कोणताही हींदी सिनेमा relase झाला आणि मी तो पाहीला नाही असे होणार नाही .. ( विश्वास ठेवा, ही अतिशयोक्ती नाही .. ) .. प्रत्येक weekend ला एक असा माझा score आहे... (या माझ्या कामगिरी बद्दल खर तर Bombay Talkies Jade Cinema Singapore यांच्या वतीने माझा जाहीर सत्कारच व्हायला हवा ... अस्सो ).... पण एक माणुस मला sollid completetion देत आहे.. and is one and only one ... ’रॉनी स्क्रूवाला’... एका weekend ला एक या rate ने मी तर फक्त सिनेमा बघतो...पण हा तर एका weekend ला एक या rate ने सिनेमा produce करतो... अरे काय ??? असे कोणते आणि कीती स्क्रु याने विकले आहेत की याच्याकडे इतका पैसा आहे ?.. अस्सो....तो भाग वेगळा....

मी समीक्षक ( ’critic' हा शब्द वापरायला जास्त छान वाटत ना ? :) ) नाही... पण जर हिमेश रेशमिया स्वत:ला हीरो म्हणवुन घेतो तर जगात कोणी कोणालाही काहीही म्हणु शकते असे मी जाहीर करतो. ...हिंदी सिनेमा बघताना माझ्या अपेक्षा पण फ़ार माफक असतात हो..तुषार कपूर कसा आपण एका तरी सिनेमा मध्ये हीरो म्हणुन hit होऊ य़ा भावनेने अभिनय (?) करतो... अगदी तसेच जरा तरी मनोरंजन होइल या भावनेने मी सिनेमा बघतो...परंतु सानिया मिर्झा कशी प्रत्येक grandslam मधुन हात हलवत परत येते ना, तसाच मी प्रत्येक वेळेस निराश होउन परततो... ( सानिया मिर्झा वरुन आठवले की कोणीतरी दीया मिर्झा नावाच्या ताई पण या line मध्ये कधितरी आल्या होत्या ना ? त्याना आता किती पोरं-बाळं ... अस्सो ... ) पण माझ्या आणि सानिया मध्ये पण साम्य आहे बर का.... तीला असे वाटते की पुढच्या grandslam मध्ये तीला नक्की better perform करायला जमेल आणि मला असे वाटते की पुढच्या weekend ला मला नक्की better performance बघायला मिळेल....

मागच्या एक-दीड महीन्याचा आढावा घेतला ना तर न्यु यॉर्क, कंबक्त इश्क, लव आज तक, कमीने.... कमीने ... कमीने ????.... अरे, हे काय नाव आहे ? आधी मला वाटले की मराठी सिनेमा आहे आणि Swine flu ची परीस्थिती लक्षात घेउन एका भाऊक producer ने देवाला साकडे घातले आहे की देवा नारायणा जरा ’कमी ने ’...( sorry...sorry.... पण अहो, असले सिनेमा पाहील्यावर विनोदाची पातळी पण अशीच होणार हो... )... बर... धर्मेन्द्र चा या सिनेमाशी अर्था-अर्थी संबंध नाही ( म्हणजे त्याचे पैसे यात गुंतले नाहीत ).... review मध्ये ४ स्टार , त्यामुळे माझ्या अपेक्षा आधिच खुप वाढल्या होत्या पण माझी अवस्था अगदी तशी झाली जशी निवडनुक निकाला नंतर BJP ची झाली होती...

परवा तर हाइट झाली ... " आगे से राईट "......पुर्ण सिनेमा संपला तरीही मला सिनेमा अणि त्याचे नाव यातला संबंध कळलाच नाही.....श्रेयस बद्दल आपण नंतर बोलुयात.. ( शेवटी एका मराठी माणसानेच दुसर्या मराठी माणसाला पाठीशी घालायचे.... :) ) ...बहुदा ते एक कोडे असावे की ’ ओळखा पाहु, असे नाव का ठेवले ते ’.... म्हणजे मग माणसाने विचार करुन-करुन करुन-करुन करुन-करुन त्याच्या बुद्धीला चढलेला गंज जरा तरी उतरेल....

तुम्हाला असे वाटत आहे का की मी वैतागलो आहे ? ... तसे असेल तर आत्ताच सांगतो की जो माणुस ’द्रोणा’ पाहील्या नंतर सुद्धा पुन्हा हींदी सिनेमा बघु शकतो त्यात खरा संयम आहे... त्यात परत ’सावरीया’ आणि ’ओम शांति ओम’ असे दोन सिनेम ६ ते ९ आणि ९ ते १२ असे सलग पाहण्याच्या कमगिरीची नोंद माझ्या नावावर आहे....’आजा नच ले’ हा सिनेमा काही अपरीहार्य कारणामुळे ( याला लोकाग्रह असे म्हणु शकतो ) ३ वेळेस पाहण्याचा पराक्रम मी केलेला आहे...तेव्हा...असल्या क्शुल्लक गोष्टींमुळे डगमगणारा मी नव्हे.....माझ्या शौर्याचा अंदाज तुम्हाला आला असेलच म्हणुन सांगतो की Bollywood वर माझा खूप जास्त विश्वास आहे....अगदी तसा जसा भारतीय क्रिकेट मंडळाचा पार्थीव पटेल वर ...

त्यामुळे मी आता नव्या दमाने weekend ची वाट पाहात आहे.... या week मध्ये प्रदर्शीत होत आहे ’Three Love Lies Betrayal' .... !!!