Thursday, April 23, 2009

माझे लिखाण !!!

बरेच दिवस झाले... ’काहितरी लिहायचे आहे... लिहायचे आहे ’ अरे केवळ म्हणत होतो... मुहुर्त काही लागत नव्हता ... पण खरी गोष्ट अशी आहे की काही सुचतच नव्हते...असे काही न सुचल्यामुळे जर खुप दिवसात काही लिहिले गेले नाही आणि कोणी त्या बद्द्ल विचारले तर मी सांगतो.. " अमिर खान कसा वर्षातुन फ़क्त २ सिनेमा करतो, तसा मी २ महिन्यातुन फ़क्त १ blog लिहीतो...हे हे हे "....चला... शार्दुल साहेब, लोकांनी फ़टके मारण्या आधी टिंग्या मारणे पुरे करा.... :) :) :)

आता काय सांगु माझी व्यथा... खुप वेळेस कागद-पेन घेउन बसतो... काहीतरी खरडतो...कसं-बसं एक पान पुर्ण करतो... नंतर वाचतो तर माझी मलाच लाज वाटते...अरेरेरेरेरेरे....मीच ते फाडुन टकतो...पाचवीतली कविता आठवतो... ’नन्ही चिंटी जब दाना लेकर चढती है... चढती दिवारपे सौ बार फ़िसलती है ’ .... मुंगी पासुन पुन्हा inspire होतो ( वा वा... ) ...पुन्हा एकदा कागद घेतो...पुन्हा फडुन टाकतो... :( ...मला काहीच सुचत नाही हो... बाहेर मात्र सर्वांना ताठ मानेने सांगतो " मी माझे सर्व लिखाण publish करत नाही...मी फक्त स्वत: साठी लिहितो.. " हे हे हे....( वाह रे मेरे proposal के शेर... what a compliance ) ... :) :) :)

आज काल मी recession चे कारण पुढे करतो... ( this is too much ... )....." अरे बाबा... भल्या-भल्या company ने projects hold वर टाकले आहेत...तेव्हा माझ्या सारख्या छोट्या माणसाची काय कथा ... " हे हे हे..... समोरच्याला पण माझ्या मेंदु मधले recession कळले असावे...तो पुढे काही विचारतच नाही.... नाईलाज आहे हो... काही सुचतच नाही....

आधुन-मधुन मी ’ग्यान’ वाटतो....मी सांगतो " असं जमत नाही...लिखाण म्हाणजे काही printer नाही... तो कसा ’print’ म्हणले की गुमाने print करतो...पण...’ लिहा’ ही command मला माझ्या menu / file मध्ये सापडतच नाही..." :)

परवा एक मित्र म्हणाला .." बोल बच्चन कमी कर...तुझ्या बुद्धीला गंज चढला आहे...इतक्या गोष्टी आजु-बाजुला बघतोस...मग काय विषय नाही लिहयला ? " ... माझा मित्र विसरला की मी sales मध्ये काम करतो...." अरे राजा... नुसता विषय पुरतो का ?... mood पण काही गोष्ट असते... पिसे असली तरी मोर उगाच पिसारा फुलवुन नाचतो का ?.... त्यासाठी पाऊस पडावा लागतो...मोर खुश व्हावा लगतो..." मित्र मला थांबवुन म्हणाला "पुरे.... जमलं तर लिही...नाही तर राहीले ... " हे हे हे... :) :) :) ..... पण खरच मला काही सुचत नाही हो...

कधी कधी मी सांगतो..." मी फक्त quality stuff लिहितो " ...( म्हणजे बाकी लोक काय खराब quality चे लिहीतात का ? ) ... हे म्हणजे अगदी VVS Laxman ने " मी फक्त test cricket खेळतो " असं सांगण्या सारखे झाले... :) :)..... अंदर की बात ये है की लक्ष्मणला कोणी ODI मध्ये घेत नाही आणि मला काही blog लिहायला सुचत नाही....

स्वत:ला मात्र मी साहेबांचा आदर्श घालुन दिला आहे... ( नाव घेत नाही....आपण सुद्न्य आहातच...)... किती अपयशे आली...पण...वर्षो-न-वर्षे नेटाने त्यांनी खुर्चीचा प्रयत्न चालु ठेवला आहे...मी पण कितीही काही झाले तरीही blog लिहिण्याचा मझा प्रयत्न चालु थेवणारच..... साहेब मत (vote) मागतात.. मी पण मत (comment) मागतो ... कसे ???.....:) :) :)