Thursday, April 23, 2009

माझे लिखाण !!!

बरेच दिवस झाले... ’काहितरी लिहायचे आहे... लिहायचे आहे ’ अरे केवळ म्हणत होतो... मुहुर्त काही लागत नव्हता ... पण खरी गोष्ट अशी आहे की काही सुचतच नव्हते...असे काही न सुचल्यामुळे जर खुप दिवसात काही लिहिले गेले नाही आणि कोणी त्या बद्द्ल विचारले तर मी सांगतो.. " अमिर खान कसा वर्षातुन फ़क्त २ सिनेमा करतो, तसा मी २ महिन्यातुन फ़क्त १ blog लिहीतो...हे हे हे "....चला... शार्दुल साहेब, लोकांनी फ़टके मारण्या आधी टिंग्या मारणे पुरे करा.... :) :) :)

आता काय सांगु माझी व्यथा... खुप वेळेस कागद-पेन घेउन बसतो... काहीतरी खरडतो...कसं-बसं एक पान पुर्ण करतो... नंतर वाचतो तर माझी मलाच लाज वाटते...अरेरेरेरेरेरे....मीच ते फाडुन टकतो...पाचवीतली कविता आठवतो... ’नन्ही चिंटी जब दाना लेकर चढती है... चढती दिवारपे सौ बार फ़िसलती है ’ .... मुंगी पासुन पुन्हा inspire होतो ( वा वा... ) ...पुन्हा एकदा कागद घेतो...पुन्हा फडुन टाकतो... :( ...मला काहीच सुचत नाही हो... बाहेर मात्र सर्वांना ताठ मानेने सांगतो " मी माझे सर्व लिखाण publish करत नाही...मी फक्त स्वत: साठी लिहितो.. " हे हे हे....( वाह रे मेरे proposal के शेर... what a compliance ) ... :) :) :)

आज काल मी recession चे कारण पुढे करतो... ( this is too much ... )....." अरे बाबा... भल्या-भल्या company ने projects hold वर टाकले आहेत...तेव्हा माझ्या सारख्या छोट्या माणसाची काय कथा ... " हे हे हे..... समोरच्याला पण माझ्या मेंदु मधले recession कळले असावे...तो पुढे काही विचारतच नाही.... नाईलाज आहे हो... काही सुचतच नाही....

आधुन-मधुन मी ’ग्यान’ वाटतो....मी सांगतो " असं जमत नाही...लिखाण म्हाणजे काही printer नाही... तो कसा ’print’ म्हणले की गुमाने print करतो...पण...’ लिहा’ ही command मला माझ्या menu / file मध्ये सापडतच नाही..." :)

परवा एक मित्र म्हणाला .." बोल बच्चन कमी कर...तुझ्या बुद्धीला गंज चढला आहे...इतक्या गोष्टी आजु-बाजुला बघतोस...मग काय विषय नाही लिहयला ? " ... माझा मित्र विसरला की मी sales मध्ये काम करतो...." अरे राजा... नुसता विषय पुरतो का ?... mood पण काही गोष्ट असते... पिसे असली तरी मोर उगाच पिसारा फुलवुन नाचतो का ?.... त्यासाठी पाऊस पडावा लागतो...मोर खुश व्हावा लगतो..." मित्र मला थांबवुन म्हणाला "पुरे.... जमलं तर लिही...नाही तर राहीले ... " हे हे हे... :) :) :) ..... पण खरच मला काही सुचत नाही हो...

कधी कधी मी सांगतो..." मी फक्त quality stuff लिहितो " ...( म्हणजे बाकी लोक काय खराब quality चे लिहीतात का ? ) ... हे म्हणजे अगदी VVS Laxman ने " मी फक्त test cricket खेळतो " असं सांगण्या सारखे झाले... :) :)..... अंदर की बात ये है की लक्ष्मणला कोणी ODI मध्ये घेत नाही आणि मला काही blog लिहायला सुचत नाही....

स्वत:ला मात्र मी साहेबांचा आदर्श घालुन दिला आहे... ( नाव घेत नाही....आपण सुद्न्य आहातच...)... किती अपयशे आली...पण...वर्षो-न-वर्षे नेटाने त्यांनी खुर्चीचा प्रयत्न चालु ठेवला आहे...मी पण कितीही काही झाले तरीही blog लिहिण्याचा मझा प्रयत्न चालु थेवणारच..... साहेब मत (vote) मागतात.. मी पण मत (comment) मागतो ... कसे ???.....:) :) :)

25 comments:

Antar-man said...

Recession disate aahe... ithepan...

push said...

kahi suchat nahi mhanat,barch kahi lihun gela hann.
jokes apart.......it is very good..

Gopinath said...

Shardul.. ekdam sahi lihitos. wachayala chan watate. asech lihit ja. pan fakta adhun madhun nako.. it should be regular.. keep it up.

Dhairyashil Dubal (DD) said...

Kay re Tula lihayala Vishay sudha lagat nahi…….
Ata bagh na suchat nahi suchat nahi mhanatos ani …. Yawar hi mast blog lihun kadhalas....
tu agadi ashakya aahes.

Shilpant said...

Waah waah waah!! Kya baat hai! Kahi suchat nahi mhane!

Nautanki kuthla!

:) :) :)

Yawning Dog said...

maze mat dile me tula :)

Parag said...

मी शब्दांच्या घालीत बसतो अमाप राशी
जखमी होता धावत जातो शब्दांपाशी
शब्दच झाले मालक आता तुझ्या जिण्याचे
जनावराने काबिज केला हा दर्वेशी.
---Kusumagraj.
so keep writing :)

Dhanashree said...

सुंदर ... हे असा पाहिजे आपल्या हवा तेव्हा, हवा तेवढा अणि हवा तसा लिहायचा ....:) अणि वर सुचत nahi कही असा ही म्हणायचा ... :) zakas .." हम को देखो हम हे रजा अपनी मर्जी के रजा " रंगीला cha हे gana तुला perfect आहे :) आपल्याला हवा तेव्हा हे असा काहीतरी भारी लिहायचा खूप छान अणि सहज लिहिला आहेस :) असाच लिहित रहा

AmitG said...

hehe..nice post Shardul! :)

kedar said...

mala aase vatate ki ha typical vaitagalela shardul dakhavanara blog aahe, mhanaje shilpa ne aagadi uttam ani thodakya shabdat lihile tase "Nautanki". Pan hya hoonahi aadik kahi navin gune dokavatana disale (shakyeto lagna javal yet aahe mhanun hote aasave). Te aase ki hya blog madhale mala aavadalale udaharan mhanaje Morache. He udaharan mhanaje typical puneri koknasta tomana aahe, karan ha tomana ikun samorachyane vicharalech pahije ki "tumhi Puneri Koknasta ka".....
Asso kahihi mhana shardul cha ha blog mhanaje comment denaryansathi "chaukar ani shatkar maranyacha" uttam chance aahe......
Hach chance aahe ghya haat dhuvun.......hehehehe....

kavita said...

hmmm ata kahi suchat nahiye comment karayla agadi tujhyasarkhach jasa tula bolg lihayla suchat nahi ani amhala comment karayla tari mhantla tujhyasarkha praytna karu ani baghta baghta blog wartich tu bloag lihilas..chan ahe...ani majhya pan 4 5 oli jhalya lihun mhanta mhanta...;)

Deepty said...

सुचत नहीं, महनत महानता १ ब्लॉग मधे तू २-३ विषयांवर बोललास... which is really appreciable....keep writing

Shilpa said...

Pahilyanda kahi suchat nahi asa wachala tenva mala watala ha blog 6 june chya intajar madhe aahe... pan wegalech wachayala milale.. ;)
any way... je lihila aahes te chhan lihila aahe...
next update kadhi yenar ?? aata parat mhanu nakos kahi suchat nahi

mugdha said...

sadhya kay comments deu suchat nahiye tu je lihil ahe te tu amhala roj bolun dakhavtos fakt tyatale kahi shabd vegale astat kahi shabd same ahet.
E.G-he he he he.....
jast pan fadu nako nahitar nantar lihayla kahich rahnar nahi.....mi kahi majhi pan denar nahi mala pahijet comments lihayla......hehehhehheehhhe......
Mala suchal ki mi comments pathavte.....to paryant dusra blog lihila tari chalel.....

chandrashekhar said...

Once again Superbbbbbbbbbbbb blog.
Kahi na suchata tula yevadh kahi suchalay jenha suchel tevnha kiti lihinar.

Neha said...

:D Sahi ree.... tula kaharach kahi nahi suchat...hya rate madhye asach rahila tarihi chalel.. "Good on ya mate" :P

sagar_dughrekar said...

छान लिहीतोस रे .... चालु ठेव

Nishigandha said...

maze vote yacha sahebala :) :)

I mean tula re......

Sumit S Purohit said...

प्रिय मित्र शार्दुल ,

खुप दिवस गेल्यानंतर तुला एक BLOG झालेला पाहुन आनंद वाटला……..आणी त्या BLOG च्या जन्माच्या वेळी सोसलेल्या कळाही समजल्या (तशा तुमच्या अंतरंगी असणार्या ना ना कळा सर्व वाचकांन्ना माहित आहेतच………    ) असो तर मुळ मुद्दा असा कि BLOG लिहायला लागणारा वेळ……….तर एक गोष्ट लक्शात घे कि चांगले BLOG लिहिणे हे स्रुजन आहे आणी म्हणुनच ते BULK PRODUCTION पेक्शा वेगळे आहे………..Coca cola or Pepsi च्या जाहिरातीचे चित्र आणी Monalisa चॆ Painting ह्या मधे पहिल्या चित्राचा संबंध डोके (आणी खिसा) याच्याशी तर दुसर्या चा थेट ह्रुदयाशी आहे…….आणी आमच्या साठी (म्हणजे ज्या लोकान्ना तुझे BLOG वाचणे आणी त्याचे कौतुक करणे अशा दुहेरी शीक्शेला सामोरे जावे लागते ते पामर लोक) तुझे BLOG हे देवाच्या प्रसादासारखे आहेत……..त्याने द्यावं आणी आपण खावं……काय द्यावं, कधी द्यावं आणी किती द्यावं हे तो ठरवणार………so तु देत रहा (आमची सहनशक्ति अचाट आहे   आणी BLOGSPOT वर जागाही)…………आणी तु जोवर काही चांगले लिहिणार नाहिस तोवर माझ्यासारखे कुजके कांदे त्यावर comment कशी लिहिणार ????? म्हणुन तुज़्या लिखाणाला सलाम…….ते वाचणार्यांन्ना सलाम…….comments लिहिणार्यांन्ना सलाम आणी BLOG आणी COMMENTS दोन्हीकडे दुर्लक्श करणार्यांन्नाही सलाम……सलाम…..सलाम…..सलाम……………

प्रशांत said...

http://marathi-e-sabha.blogspot.com/2009/02/blog-post.html

६/७ जून २००९ रोजी स्काईपवर जगाच्या पाठीवरील मराठी ब्लॉगकार (मराठीतून ब्लॉगलेखन करणारे) ए८कत्र जमून अभिवाचन करणार आहेत. ही सभा ५-६ सत्रांमध्ये पार पडणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ६ जूनच्या सकाळी ८ वाजेपासून ७ जूनच्या सकाळी ७-८ वाजेपर्यंतच्या काळात वेगवेगळी सत्रे होणार आहेत. तुम्हाला सोयीस्कर असलेल्या कुठल्याही सत्रात सहभागी होता येईल. त्यासाठी shabdabandha@gmail.com येथे तुमचा ईमेल, नाव, ब्लॉगचं नाव व ब्लॉगची लिंक लवकरात लवकर पाठवा. (शक्यतो १-२ दिवसांत). त्यानंतर गुगलग्रुपमध्ये प्रवेश देण्यात येईल, तिथे अधिक माहिती मिळेल.
धन्यवाद.

Hrishi said...

mala pan yaavar kaay lihu te suchat naahiye,... write up laa flow changla aahe. Vaachayala kantala nakkich yet naahi. I am optimistic! :-)

Deep said...

wawa hya madeechyaa kaalat evdhe vichaar mag "tejeet" kaay hoil? good one :)

Deep said...

bar aankhee ek hee saglee kaarne mi mazya blog var (mi hi sadhya lihit naahi!) copy paste kelee tar chaalteel na?? ;)

Deep said...

Hey, next update on
एक प्रवास... कधीही न संपणारा... (फायनल) is now published! :D you can have a look ;)

हेरंब ओक said...

जबरदस्त. काही सुचत नाही म्हणताना इतकं लिहिलं आहेस. सहीच !!!