Tuesday, October 30, 2007

आज-काल चे चहा-पोहे !!!

आज-काल सगळीकडे एकाच वि‍षय असतो..याचं लग्न ठरलं किंवा तीचं लग्न ठरलं..मग कधी ते love marriage असत तर कधी arrange marriage...

आज-काल मी देवाची प्रार्थना करत असतो की ’ देवा !!!! माझ्यावर चहा-पोहे ची वेळ नको रे ’... Officially flirting करण्याची मजा कितीही छान असली तरीही मी जेव्हा seriously विचार करतो तेव्हा मला चहा-पोहे म्हणजे problem असच वाटतं...त्याचं काय आहे की आज-काल जमाना बदलला आहे.. मुली ऐवजी मुलाने चहा-पोहे बनवण्याची वेळ सुद्धा येऊ शकते...

मुळातच आता चहा-पोहे ही concept जाऊन त्या ऐवजी CCD-Barista ची concept आली आहे...पुर्वी कसं मुला कडली सगळी प्रजा, प्रजा म्हणजे मुलगा, त्याचे आई-बाबा, एखादी कार्टी जी की त्या पोराची बहीण असते, एक मित्र जो की मुलीची बहीण किंवा मैत्रिण बघण्यात जास्त interested असतो झालच तर आजोबा-आज्जी, जमलच तर एखादा काका व मामा हे सगळे forms प्रजा...तर, पुर्वी कसं मुला कडली सगळी प्रजा मुलगी पाहणे या लढाई ला जायचे...मग तेथे ठरलेले "मुली गाऊन दाखव" किंवा " सगळा स्वयंपाक सुंदर बनवते ही" अशी वाक्य असायची..आता तो सगळा भुतकाळ..आज-काल फक्ता मुलगा आणि मुलगी भेटतात आणि या meetings CCD-Barista अशा ठीकणी होतात...

परवाच एक मित्र सांगत होता, " यार, ३०० रुपये गेले..जर मी एका महीन्यात १० मुली पहील्या तर ३००० रुपये तर असेच जातील... "

माझं डोक नको तेथे जरा जास्तच चालतं... त्याला म्हणालो," मित्रा, एक काम कर...पुढ्च्या वेळेस भेटीचे ठीकाण पर्वती किंवा चतुर्‍श्रुंगी ठरव...म्हणजे सुरुवातीलाच ऊंच चढायला लागल्याने पोरगी जरा थकेल आणि कमी बडबड करेल ( मुलांच्या अपेक्षा पण कीती माफक आणि भोळ्या-भाबड्या मनाने केलेल्या असतात ना ? ) ..मग तुच २-४ वाक्य सहजतेने टाकुन दे की ’CCD-Barista मध्ये गोंधळात भेट नको..नीट बोलण होत नाही’...वरुन हे पण सांग की ’ मला अशा शांत ठीकाणी यायला फार आवडतं ’.. " मला वाटत की निदान पहिल्या भेटी मध्ये तरी असली थाप खपून जाईल...तेथे एखादी भेळेची गाडी असेलच..सगळं बोलुन झाल्यावर मस्त पैकी १-२ भेळ गट्टम कर..मग बाजुच्या टपरी वरचा cutting मारायचा..पण तो मारता-मारता " Barista च्या coffee मध्ये ही मजा नाही " असा निदान दोन वेळेस तरी बोलायचं..पुर्ण भेटीच्या दरम्यान "मला साध्या गो‌ष्टी खुप आवडतात " हे वाक्य जास्तीत जास्त २ वेळेस आले पाहीजे..ऊगाचच एखाद्या हुशार पोरीला शंका यायची...५० रुपयात काम झालं की नाही दोस्ता ???

आज-काल बरेच जण s/w मध्ये कामं करतात...त्यामुळे प्रत्येक नविन मुलगी बघताना हीच वरची procedure "copy-paste" कशी करायची हे वेगळे सांगायला नको...

परवा कानावर नविनच गो‌‍ष्ट पडली...आज-काल onsite जाऊन आलेल्या मुलांचा भाव भलताच वाढला आहे म्हणे...पैसा वेगैरे सगळं सोडा हो...पण अशी मुलं खुप समजुतदार असतात म्हणे...ही पोरं दिवसा office मध्ये कामं करुन मग रात्री स्वयंपाक पण करु लागतात म्हणे..त्या नंतर भांडी पण घासतात म्हणे..weekend ला कपडे पण धुतात ...आणि येवढे सगळे करुन कायम ऊत्साही पण असतात म्हणे...यार... हे सगळं बोलणारा माणुस माझ्या समोर यावाच एकदा...नाही तर काय...मला आता भारतात परत जायची भीतीच वाटायला लागली आहे...!!!

Monday, October 15, 2007

Proposal Engineer

Cricket खेळण्याचा आणि माझा संबंध शाळेतच सुटला ... पण आज-काल जाणवायला लागले आहे की माझी अवस्था बरया पैकी cricketers सारखी झाली आहे..

मी proposal engineer आहे... नावावर जाऊ नका ...आमच्या field मध्ये तसेही propose करण्या सारखे interesting असे काही नसते..cricket मधल्या opener सारखी batting मी करतो...म्हणजे, कोणत्याही project ची सुरुवात ही proposal बनवण्या पासुनच असते..ती सुरुवात मी करतो...
जसे समोरच्या बाजुचे fast bower वेगाने मारा करतात तसा मी पण सगळे client चे त्यांच्या format मधले documents पहील्या १-२ दिवसात ( like first couple of overs ) सावध पणे वाचुन काढतो..आणि मग खेळ पुढे सुरु...

आज-काल मी बराच फ़ीरतो...Asia-Pacific support च्या नावाखाली माझे India-Singapore-Thailand-India असे चालु आहे जसे मुदखेड-मनमाड-पुणे-दौंड passanger...त्या Air-hostess ने फ़क्ता आता विमानाच्या दरवाज्यात " ओओओओओ मामा, तीच तुमाची कोपरयातली खिडकी " असं म्हणायचा बाकी आहे..पण मला वाटता की उपमा द्यायची म्हणला तर एका colony मढ्ये असणारया धुणे-भांडे करणारया एकाच बाई ची ऊपमा योग्य होइल ... प्रत्येक घरातली बाई तीला जसं आपल्याच घरातले काम आधी करुन जायला सांगते ना, त्यातला भाग आहे हा...किंवा मग cricket मधला १२वा गडी..पाणी म्हंटल की जातो पळत..gloves म्हंटल की जातो पळत..माझं असच आहे हो...
अस्सो....

कधी-कधी मला proposal बनवणे हे slog overs खेळल्या सारखे वाटते..तर कधी-कधी proposal म्हणजे power play...power play मध्ये कसं ५ overs मध्ये हाणामारी करुन घ्या..बसं तसच सांगतात मला.." ५ दिवस आहेत तुझ्याकडे..५ दिवसात proposal बनवुन टाक" ..proposal submit होऊन ३-४ दिवस होत नाहीत की तो पर्यंत दुसरा power play सुरु होतो..revision नावाचा..मग proposal revise करुन टाक..आणि या हाणामारीत माझी wicket पडून जाते..

Engineering Dept मधल्यां सारखे ६-६ महीने चालण्यारया project नावाची test match मला खेळायलाच मिळत नाही..pitch चा अंदाज घेत आरामात दिवस-दिवस खेळून मग century मारावी असं मला पण वाटत हो..पण काय करणार.. आमचा प्रकार म्हणजे सगळा २०-२० आहे..

कधी-कधी मला वाटत की माझा धोनी झाला आहे...world cup हरलो की घाला शिव्या..दिलेला plot परत मागतात..आणि २०-२० जिंकलो की लगेच "झारखंड रत्न"..तसच, एखादे proposal जर order मध्ये convert झाले तर लगेच appriciation..पण जर काहीही कारणाने order गेली तर लगेच proposal engineer ला मिळणारया facilities ची list वाचल्या जाते...

मला वाटत आहे की रवि शास्त्रि ला गुरु मानावा...जमतय तितके दिवस खेळुन घ्यावं..त्याच बरोबर बाकी options पण open ठेवावेत..तो commentry करतो, आपण consultancy करावी..ऊद्देष एकच, समोरच्या वर तोंड्सुख घ्यावं आणि त्यासाठी तीसरयाच कोणालातरी charge कराव..कसे ????

Friday, July 6, 2007

ये देस है कैसा ???

परदेश आणि गमती-जमती.. वाचताना छान वाटेल .. पण "ज्याची जळते ना..त्यालाच कळते " यातला प्रकार आहे तो..


Australia..Melbourne.. ’ते काय लई भारी आहे का?’ असं म्हणत तेथे पोहोचलो..मी आणि माझी एक टीम मेट..रविवरी सकळी पोहोचलो..’jet lag.....jet lag' बरीच वर्ष याचे फक्त नावच ऐकुन होतो..हा प्राणि / वस्तु / आजार जे काय आहे ते exact काय आहे हे जाणुन घेण्याची मझी ईच्छा चांगलीच पुर्ण झाली..दिवसभर झोप काढल्यावर सन्ध्याकाळी काय करावं ? सकाळी taxi मधुन hotel मध्ये येताना कोपऱ्यावर McD आहे हे पाहीले होते..आम्ही दोघाही चक्कर मारायला निघालो..रस्त्यावर काळं तर सोडाच पण कुठलही कुत्रं / मांजर / माणुस यातल काहीही दिसलं तर शप्पथ..McD च्या त्या कोपऱ्यावर signal होता..पाई चालणाऱ्यां साठी तो सध्या लाल होता..सुशिक्षीत असल्याने ’थांबायचे’ हे माहीत होते..थांबलो बिचारे..एक min झाला , दोन min झाले..लाल चा लालच..तो काही केल्या हीरवा व्हायचे नाव घेत नव्हता..त्याला दोन शिव्या हासडल्या आणि "येथे पण system आपल्या भारता सारखीच .. चालु पण चुकीची " असं म्हणत रस्ता ओलांडला..तीन दिवसांनी office मधल्या एका Indian ला सांगत होतो तर तो हसुन हसुन वेडा झाला..आता "त्या signal pole ला एक कळ असते आणि ती दाबुन आपण स्वतः signal हिरवा करुन घ्यायचा असतो" हे काय त्यांच्या पंतप्रधानाने मला स्वप्नात सांगितले होते ???


मझ्या office मधला एक जण England मध्ये होता..तेथील office प्रत्येकाला car देतं..आजुन तीन जण गेले आणि ज्या दिवशी पोहोचले त्याच दिवशी हे तिघे त्याची car घेउन भटकायला निघाले..driving एकालच येत होते..साहेबांकडे भारतात maruti 800..आणि तिकडे ती भली मोठ्ठी लांबच लांब car..कोणा कडेही mobile नाही..एका dead end ला पोहोचले..वळवा-वळवा..गाडी मागे घ्या..काही केल्या reverse gear पडेना..सगळे प्रयत्ना करुन झाले..मग सुरु केले ना.."जोर लगाके..हैय्या....दम लगके..हैय्या" ...एक इंग्रज पण ’big problem' म्हणत त्याना join झाला...बाबा रे..reverse gear हा थोडासा वर ऊचलुन मग मागे टाकयचा असं त्याला भारतात साक्षात नारायण कार्तिकेयन ने जरी सांगितले असते तरी त्याला पण वेड्यातच काढले असते ना ???


Singapore म्हणजे तर शिव्याच हो.. "okie la "....."go la" .... " come la "....ज्याला त्याला "ला-ला"...चला, हे मात्र एक बरे आहे..येथे आपण अगदि बिनधास्त पणे तोन्डाचा पट्टा चालवावा .." आय-ला" , "माय-ला" ,"च्याय-ला" या नविन शब्दां बद्दल त्याना सुचवावे असे म्हणलो...कसे ???


SEA म्हणजे South East Asia बर का....( मला पण आत्ताच कळलं हो..) येथे तर सगळा आनंदाचाच सागर आहे...आपण काय बोलतो हे त्यांना आणि ते काय बोलतात हे आपल्याला पहील्या झटक्यात कळाले ना तर मी पण "युरेका-युरेका" ओरडत ( त्याच अवस्थेत ) सुटायला तयार आहे..मला sim card हवे होते..Bangkok मध्ये ते रस्त्यावर विकत मिळते..मी त्या मन्द बुद्धी ( पण सुंदर ) पोरीला विचारत होतो की मला यावरुन भारतात फोन करता येतो का ? आणि ती म्हणाली ना "you call India"..खुशीने बेहोष व्हायचा बाकी होतो मी..call करता येतो यापेक्षा जास्त आनंद मला याचा झाला की मला काय पाहीजे हे तीला कळाले..मग मी तीला विचारले की यात credit किती आहे ? बाई ला समजले नाही..म्हणलं ठीक आहे...विचारले की recharge करता येते का? हसायला लागली हो..मी काहीही विचारले की एक तर हसायची किंवा मग " you call India " आणि परत हसणे..थोड्या वेळाने " I call India " म्हणजे मी काही अक्षम्य गुन्हा करत आहे असे मला वाटायला लागले..एक तास कार्टी ला समजावले हो.. पण काही केल्या घोडयाने पाणि प्यायले नाही..


Australia मध्ये रस्ता ओलांडायची वेगळी पद्धत..Singapore मध्ये कोडे मारतात म्हणे मधुनच रस्ता ओलांडला तर..म्हणल ’असेल बाबा’..Bangkok मध्ये पहील्या दिवशी hotel मधुन बाहेर पडलो.. पलीकडल्या बाजुने taxi पकडायची होती..इकडे-तीकडे पाहीले..कोणीच रस्ता cross करत नव्हते..३-४ जणांनी येवढे विचित्र पाहीले ना मझ्या कडे..मी फक्त ’रस्ता कोठे cross करु शकतो’ येवढेच विचारले होते..माझ्या नशिबाने एकाला कळला प्रकार..तो बहुतेक बाहेर फीरुन आला असावा..तो मला "No No...you cross-cross ..everywhere " असं म्हणाला ना , अगदी स्वदेशी आल्या सारखा आनंद झाला मला..


अस्सो...मी सुटलो की सुटातोच..so..
" I stop .. you finish read ... I thank you "

Tuesday, July 3, 2007

Accept

Accept हा जगातला सर्वात अवघड शब्द असावा का ?कारण या शब्दाचा केवळ अर्थ समजुन घेण्यात बरीच वर्ष जातात आणि बऱ्याचदा कोडं काही सुटलेलं नसतं...

एखादी गोष्ट आपण Accept केली की मग बरेचसे problem अपोआप सुटतात..सध्या रोजच्या जगण्यात अपल्याला काही गोष्टी घडणं अपेक्षीत असले आणि अगदी विरुद्ध काहीतरी घडते..कही घडून गेले आहे, जे बदलता येणार नाही अशा वेळेस पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता यावर लवकरात लवकर पोहोचणे म्हणजे घडलेली गोष्ट योग्य रीतीने accept करणे..न की केवळ असे घडायला नको होते व त्यावर रडत बसणे..होय..परीक्षण नक्की करवे..चुका का घडल्या व कोठे घडल्या याचा विचार नक्की करावा..पण पुढे घ्यायचे निर्णय हे तेव्हड्याच खंबिर मनाने ’as if nothing happened' घेत येणं म्हणजे accept करणे...


नविन mobile घेताला...wow...पण मला असे वाटते की तो घेतानाच मनची तयरी ठेवावी की दुसऱ्या दिवशी तो चोरीला जाऊ शकतो किंवा पडुन तुटु पण शकतो..काहीही झाले तरीही materialistic गोष्टी या..विश्वास ठेवा..उद्या असे काही झालेच तर होणारा त्रास कमी होतो..मला हे नाही म्हणायचे की असे करुन आपण अपल्या कडून होणाऱ्या चुकांवर पांघरुण घालावे..never..analysis नक्की करावे..पण त्याचा फायदा वर्तमान आणि भविष्या साठी व्हावा..past चा आयुष्यावर होणारा impact हा positive असणे म्हणजे situation accept करणे...


आयुष्य खुप सुंदर आहे..याचा क्षण-न-क्षण आपल्याला उपभोगता आला पाहीजे..या खाली लिहीलेल्या कवितेच्या ओळी मला कायम अठवतात..

हसुनि स्वतः तु हसवं जगला..
दो हातांनी उधळ सुखाला..
खुल्या दिलाचा सुर असुदे, नित्य तुझ्या गण्यात..

गेल क्षण का स्मरण तयाचे..
का डीवचावे प्रश्न उद्याचे ..
सोन्याचा हा वर्तमान तु, घे भरुनी ह्रुदयात...


आत्ता जगत असलेल्या क्षणी, योग्या priority ठरवुन त्या प्रमणे निर्णय घेता येण म्हणजे situation accept करणे...


आयुष्यात प्रश्न कोणाला नसतात ?? प्रत्येकालाच आपला प्रश्न सर्वात मोठ्ठा वाटत असतो..एखाद्या पाच वर्षाच्या मुलाला घसरगुंडीची शिडी चढता न येणे हा जगातला सगळ्यात मोठा problem वाटतो..तर एखाद्या गरीब मुलाला १२ च्या निकाला नंतर engineering च्या प्रवेशा पेक्षा पण मोठे काही असु शकते यावर विश्वास नसतो..एखाद्या प्रियकराला प्रेयसी च्या हास्यापेक्षा महत्वाचे असे काहीच नसते किंवा एखाद्या sales वाल्याला त्याची deal ही विश्व वाटु लागते..एकंदरीत ... अवघड परीस्थितीत आपण कोठे कमी पडतो ते ओळखणे आणि त्या प्रमाणे वागणे म्हणजे गोष्ट accept करणे...


केवळ "Yes...I know, I was wrong " किंवा "Yes, I made a mistake" म्हणणे आणि सोडुन देणे म्हणजे accept करणे नव्हे..तर झालेल्या चुकांची जाण ठेऊन स्वतःचे १००% देण्याचा प्रामणिक प्रयत्न करणे म्हणजे accept करणे...


" Accept is not only to agree but to agree and go ahead with a positive approach ".

Monday, July 2, 2007

काहीतरी शक्कल लढवायला हवी ... !!!

हे blogs लिहायला किंवा upload करायला लागल्या पासुन जरा गोची झाली आहे..माझे मित्र तसाही मला flirt म्हणतात..पण मी एकनिष्ट आहे हो..ज्या क्षणी जी मुलगी समोर असते, मझी पुर्ण निष्टा एकट्या तीच्यावरच असते..अगदी तशीच जशी माशीची निष्टा पण एकाच विष्टेवर असते.. ( नाकाला हात नका लाऊ..आमच्या सुर्यवंशी सरांनी शिकवलेले physics लक्षात नसले तरी त्यांचे हे वाक्य मला चांगलेच लक्षात आहे..वा सर..म्हणतात ना..कधी शिकलेले कधी कामाला येते..अस्सो...)


तर मी काय सांगत होतो, पुर्वी कसं सोपं असायचे..एक standard template बनवुन ठेवायचे..प्रत्येक नविन project किंवा proposal ला फक्ता header आणि footer बदलले की झाले..म्हणजे काय..एखादे ठेवणीतले काहीतरी लिहीलेले असायचे..प्रत्येक नविन मुलीला impress करायाला बरे पडायचे..


आपली तर strategy पण ठरलेली होती..एकच standard joke किंवा सुंदर कविता..दिसली मुलागी की मारला joke..दिसली मुलागी की मारला joke..पोरगी पण खुष आणि आपण पण खुष..आणि याच दोन पोरी समोरा-समोर आल्या की मग ’पतली गली जिन्दाबाद’..


पण आता वाट लागली राव..आता अस प्रत्येक मुलीला म्हणताच येत नाही ," हे सुन्दरी , हे सारे मी केवळ तुझ्या आणि तुझ्या साठीच लिहीले आहे .."( पण खरच जीच्या साठी लिहीले आहे तीला तरी खर-खर कळत असेल ना ? I just hope so...)


तर मुळात मुद्दा काय .... काहीतरी शक्कल लढवायला हवी ... !!!

Saturday, June 30, 2007

फीरंग

मला अठवत आहे की पुण्याच्या office मध्ये एखादा फीरंग येतो.. Boss उगाचच meeting बोलावतो..काम तसे १०-१५ min. चे असते पण ३-४ तास असच काहीतरी उकरुन उकरुन काढल्या जाते.. उगाचच खोट-खोट हसायचे.. बरेचदा तर मराठी मध्ये गप्पा..मझ्या तर team मध्ये सगळेच मरठी आहेत.. साहेब पण मराठी.. सर्व काही एकदम बिनधास्त...बिच्चारा फीरंग...उगाचच सगळे हसले की चेहऱ्यावर हसू आणतो.. इकडे तिकडे बघतो .. उगाचच मान हलवतो .. जणु काही त्याला सगळच कळतय ..

आपल्याकडे लय हौस असते की फीरंग आला की त्याला जेवायला घेऊन जायचे .. आपण त्याला TAJ मध्ये घेऊन जातो.. भारी-भारी पदार्थ order करतो..त्याला बिच्याऱ्याला पनीर काय आणि भेंडी काय .. सर्वच सारखे .. छान छान म्हणत तो थोडं फार खातो.. मनात तो अपल्याला कीती शिव्या घालत असेल ???


फीरंग बसलेला असतो .. आपण अगदी बिनधास्त त्याची मजा ऊडावतो .. मनसोक्त .. कारण आपल्याला माहीत असते ना की काहीही बोललो तरी याच्या पप्पा ला पण समजणार नही .. मजा येते ना खुप ???


बरं .. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना की मला हे सगळ आज कसे काय अठवले ?
well ( ऊगाचच feel यावा म्हणुन असे english शब्द वापरावेत म्हणे मधे मधे....अस्सो...)...आता काय सांगु ???

आज मी तो फीरंग आहे .. आणि विश्वास ठेवा आत्ता हे लिहीत असताना बदका सारखे काहीतरी आवाज काढत बोलणारे २०-२५ लोक / प्राणी या round table भोवती बसले आहेत .. आम्ही ४ वेग-वेगल्या company चे लोक एका project बद्दल final discussions ( at client side ) करत आहोत म्हणे .. हो .. "म्हणे" .. कारण हे सगळ Thai भाषेत चालु आहे .. मी आणि माझ्या बरोबरचा माझा सहकारी सोडला तर ईथे कोणालाही english येत नाही..


आत्ताच या मझ्या सहकाऱ्याने मला विचारले की काय लिहीतो आहेस ( तो singapore हुन आला आहे .. त्याला english येते .. नशिब माझे .. ) ?? त्याला सांगितले की महत्वाच्या notes लिहीतो आहे..आता त्याला तरी काय सांगाणार की.. बाबा रे .. मगाशी डोळा लागला होता .. परत डोळा लागण्या पेक्षा या notes लिहीणे बरे नव्हे का ???


आज मला मझ्या office मध्ये येऊन गेलेले सर्व-सर्व फीरंग झाडून अठवत आहेत .. देवा .. मला माफ़ कर ...

Friday, June 29, 2007

मन

कधी कधी मला माझे स्वतःचेच नवल वाटत्ते...
आजुन माझे मन ... थकत कसे नाही...
आजुन मला राग ... येत कसा नाही ...
मनास विचारतो मझ्या ... अजुन शक्ति बाकी किती ...
वाट निघेल म्हणे ... आज पर्यंत निघत गेली तशी...

असं नक्की घडावं ... !!!

असं नक्की घडावं ... !!!


मित्रांबरोबर कट्टयावर गप्पा मारत बसावं...
रंगात येऊन मी अगदी भान हरपून बोलावं...
माझ्या बोलण्याचा मझ्या मित्रांनी हसं करावं...
माझं तल्लीन होऊन सांगणं तीला मात्र आवडावं...
सगळ्यां बरोबर हसुन झाल्यावर तीने मानेनेच खुणवावं...
" मस्त बोललास " म्हणंत तीने मझ्या बरोबर निघावं...
असं कधीतरी घडावं .. नक्की घडावं ...


रोजच्या धावपळीत दोघांनीही खूप थकून जावं...
पण एक दिवस वेळ काढुन जेवाणा नंतर भेटावं...
शतपावली करता करता कोपऱ्यापर्यंत जावं...
अचानक तेव्हा मग पावसाच येणं व्हावं...
मी अडोसा शोधुन तीला बोलवावं...
तीने मात्र डोळे मिटुन, हात लांब करुन चिंब व्हावं...
असं कधीतरी घडावं .. नक्की घडावं ...


एका रात्री पार्टीला दोघानीच जावं...
अम्रुतजल पीऊन तीला धुंद नाचताना पहावं...
नंतर त्या फुलाला ऊचलुन तीच्या अपार्टमेंट मध्ये न्यावं लागावं...
त्या झोपलेल्या सुंदर बाहुलीकडे रात्रभर डोळा न लवता पहावं...
असं अनोखं जागरण एकदा तरी नशिबी यावं...
या सारख सुख शोधुन पण नाही हे अनुभवायला मिळावं...
असं कधीतरी घडावं .. नक्की घडावं ...


हे सर्व लिहीताना मनात कोणीतरी असावं...
या सर्व गोष्टींचं एक स्वप्न जागेपणीच पहावं...
स्वप्नात का होईना पण मनासारखा झाल म्हणून खूष व्हावं...
ह्या आनंदात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं...
थोड्या वेळाने मग खडबडून जागं व्हावं..खरं जग बघावं...
कविता पुर्ण झाली म्हणावं..आणि आता कामाला लागावं...
असं कधीतरी घडावं .. नक्की घडावं ...

Thursday, June 28, 2007

Here I am...

"आ-तीच्याआआआआआयला..............." ( हे एकादम अशोक सराफ type बरका....)
"लय झाला...आता आपण पण लिहायाचेच " ( Well...आपण म्हणजे मीच...त्याचे काय आहे...मला बाकी तर कोणी आदराने अहो-जाहो म्हणत नाही म्हणुन माझा मीच म्हाणुन घेतो...जुना झाला का हा joke ??? ....अस्सो...)

तसा मी बराच आधी पासून लिहितो...पण असाच...गम्मत म्हणुन...कागद आणि पेन वापरुन...पण हे छोटा / मोठ लिहिण ( अनुस्वार कसा द्यायचा हे आजुन येत नाही माला..पण शिकेन लवकरच...)...आणि ते internet वर upload करणे...म्हणजे blogs लिहिणे हे प्रकार मला तेव्हाडेसे कळत नाहीत...( तसा मी engineer आहे...आणि engineering पण चारच वर्षात केला आहे...)...पण थोडा TB आहे...( Technologically Backward असे म्हणतात म्हणे आज-काल..)


तर...नेमक झाला काय की...माझ नशिब अचानक फळफळला..( अनुस्वार कसा द्यायाचा याआआआआर ...)...आणि company ने मला onsite पाठवल..( बहुतेक team ला तीकडे भारतात काम करायचे असावे...म्हणुन काम न करणारा मी...मला दीले हाकालुन...पानचट होता ना joke ? ).. तर मी बाहेर आलो....


काम बरच आहे...पण सन्ध्याकाळचा बराच वेळ मोकळा मिळतो....मझे US मध्ये असलेले बरेच मित्र काय-काय लिहीतात आणि blogs ची link पाठावतात.. तर हे सगळे वाचता-वाचता मला पण वाटायला लागला की आपण पण इथे लिहावे...आणि...Here I am.....!!!