Friday, July 6, 2007

ये देस है कैसा ???

परदेश आणि गमती-जमती.. वाचताना छान वाटेल .. पण "ज्याची जळते ना..त्यालाच कळते " यातला प्रकार आहे तो..


Australia..Melbourne.. ’ते काय लई भारी आहे का?’ असं म्हणत तेथे पोहोचलो..मी आणि माझी एक टीम मेट..रविवरी सकळी पोहोचलो..’jet lag.....jet lag' बरीच वर्ष याचे फक्त नावच ऐकुन होतो..हा प्राणि / वस्तु / आजार जे काय आहे ते exact काय आहे हे जाणुन घेण्याची मझी ईच्छा चांगलीच पुर्ण झाली..दिवसभर झोप काढल्यावर सन्ध्याकाळी काय करावं ? सकाळी taxi मधुन hotel मध्ये येताना कोपऱ्यावर McD आहे हे पाहीले होते..आम्ही दोघाही चक्कर मारायला निघालो..रस्त्यावर काळं तर सोडाच पण कुठलही कुत्रं / मांजर / माणुस यातल काहीही दिसलं तर शप्पथ..McD च्या त्या कोपऱ्यावर signal होता..पाई चालणाऱ्यां साठी तो सध्या लाल होता..सुशिक्षीत असल्याने ’थांबायचे’ हे माहीत होते..थांबलो बिचारे..एक min झाला , दोन min झाले..लाल चा लालच..तो काही केल्या हीरवा व्हायचे नाव घेत नव्हता..त्याला दोन शिव्या हासडल्या आणि "येथे पण system आपल्या भारता सारखीच .. चालु पण चुकीची " असं म्हणत रस्ता ओलांडला..तीन दिवसांनी office मधल्या एका Indian ला सांगत होतो तर तो हसुन हसुन वेडा झाला..आता "त्या signal pole ला एक कळ असते आणि ती दाबुन आपण स्वतः signal हिरवा करुन घ्यायचा असतो" हे काय त्यांच्या पंतप्रधानाने मला स्वप्नात सांगितले होते ???


मझ्या office मधला एक जण England मध्ये होता..तेथील office प्रत्येकाला car देतं..आजुन तीन जण गेले आणि ज्या दिवशी पोहोचले त्याच दिवशी हे तिघे त्याची car घेउन भटकायला निघाले..driving एकालच येत होते..साहेबांकडे भारतात maruti 800..आणि तिकडे ती भली मोठ्ठी लांबच लांब car..कोणा कडेही mobile नाही..एका dead end ला पोहोचले..वळवा-वळवा..गाडी मागे घ्या..काही केल्या reverse gear पडेना..सगळे प्रयत्ना करुन झाले..मग सुरु केले ना.."जोर लगाके..हैय्या....दम लगके..हैय्या" ...एक इंग्रज पण ’big problem' म्हणत त्याना join झाला...बाबा रे..reverse gear हा थोडासा वर ऊचलुन मग मागे टाकयचा असं त्याला भारतात साक्षात नारायण कार्तिकेयन ने जरी सांगितले असते तरी त्याला पण वेड्यातच काढले असते ना ???


Singapore म्हणजे तर शिव्याच हो.. "okie la "....."go la" .... " come la "....ज्याला त्याला "ला-ला"...चला, हे मात्र एक बरे आहे..येथे आपण अगदि बिनधास्त पणे तोन्डाचा पट्टा चालवावा .." आय-ला" , "माय-ला" ,"च्याय-ला" या नविन शब्दां बद्दल त्याना सुचवावे असे म्हणलो...कसे ???


SEA म्हणजे South East Asia बर का....( मला पण आत्ताच कळलं हो..) येथे तर सगळा आनंदाचाच सागर आहे...आपण काय बोलतो हे त्यांना आणि ते काय बोलतात हे आपल्याला पहील्या झटक्यात कळाले ना तर मी पण "युरेका-युरेका" ओरडत ( त्याच अवस्थेत ) सुटायला तयार आहे..मला sim card हवे होते..Bangkok मध्ये ते रस्त्यावर विकत मिळते..मी त्या मन्द बुद्धी ( पण सुंदर ) पोरीला विचारत होतो की मला यावरुन भारतात फोन करता येतो का ? आणि ती म्हणाली ना "you call India"..खुशीने बेहोष व्हायचा बाकी होतो मी..call करता येतो यापेक्षा जास्त आनंद मला याचा झाला की मला काय पाहीजे हे तीला कळाले..मग मी तीला विचारले की यात credit किती आहे ? बाई ला समजले नाही..म्हणलं ठीक आहे...विचारले की recharge करता येते का? हसायला लागली हो..मी काहीही विचारले की एक तर हसायची किंवा मग " you call India " आणि परत हसणे..थोड्या वेळाने " I call India " म्हणजे मी काही अक्षम्य गुन्हा करत आहे असे मला वाटायला लागले..एक तास कार्टी ला समजावले हो.. पण काही केल्या घोडयाने पाणि प्यायले नाही..


Australia मध्ये रस्ता ओलांडायची वेगळी पद्धत..Singapore मध्ये कोडे मारतात म्हणे मधुनच रस्ता ओलांडला तर..म्हणल ’असेल बाबा’..Bangkok मध्ये पहील्या दिवशी hotel मधुन बाहेर पडलो.. पलीकडल्या बाजुने taxi पकडायची होती..इकडे-तीकडे पाहीले..कोणीच रस्ता cross करत नव्हते..३-४ जणांनी येवढे विचित्र पाहीले ना मझ्या कडे..मी फक्त ’रस्ता कोठे cross करु शकतो’ येवढेच विचारले होते..माझ्या नशिबाने एकाला कळला प्रकार..तो बहुतेक बाहेर फीरुन आला असावा..तो मला "No No...you cross-cross ..everywhere " असं म्हणाला ना , अगदी स्वदेशी आल्या सारखा आनंद झाला मला..


अस्सो...मी सुटलो की सुटातोच..so..
" I stop .. you finish read ... I thank you "

Tuesday, July 3, 2007

Accept

Accept हा जगातला सर्वात अवघड शब्द असावा का ?कारण या शब्दाचा केवळ अर्थ समजुन घेण्यात बरीच वर्ष जातात आणि बऱ्याचदा कोडं काही सुटलेलं नसतं...

एखादी गोष्ट आपण Accept केली की मग बरेचसे problem अपोआप सुटतात..सध्या रोजच्या जगण्यात अपल्याला काही गोष्टी घडणं अपेक्षीत असले आणि अगदी विरुद्ध काहीतरी घडते..कही घडून गेले आहे, जे बदलता येणार नाही अशा वेळेस पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता यावर लवकरात लवकर पोहोचणे म्हणजे घडलेली गोष्ट योग्य रीतीने accept करणे..न की केवळ असे घडायला नको होते व त्यावर रडत बसणे..होय..परीक्षण नक्की करवे..चुका का घडल्या व कोठे घडल्या याचा विचार नक्की करावा..पण पुढे घ्यायचे निर्णय हे तेव्हड्याच खंबिर मनाने ’as if nothing happened' घेत येणं म्हणजे accept करणे...


नविन mobile घेताला...wow...पण मला असे वाटते की तो घेतानाच मनची तयरी ठेवावी की दुसऱ्या दिवशी तो चोरीला जाऊ शकतो किंवा पडुन तुटु पण शकतो..काहीही झाले तरीही materialistic गोष्टी या..विश्वास ठेवा..उद्या असे काही झालेच तर होणारा त्रास कमी होतो..मला हे नाही म्हणायचे की असे करुन आपण अपल्या कडून होणाऱ्या चुकांवर पांघरुण घालावे..never..analysis नक्की करावे..पण त्याचा फायदा वर्तमान आणि भविष्या साठी व्हावा..past चा आयुष्यावर होणारा impact हा positive असणे म्हणजे situation accept करणे...


आयुष्य खुप सुंदर आहे..याचा क्षण-न-क्षण आपल्याला उपभोगता आला पाहीजे..या खाली लिहीलेल्या कवितेच्या ओळी मला कायम अठवतात..

हसुनि स्वतः तु हसवं जगला..
दो हातांनी उधळ सुखाला..
खुल्या दिलाचा सुर असुदे, नित्य तुझ्या गण्यात..

गेल क्षण का स्मरण तयाचे..
का डीवचावे प्रश्न उद्याचे ..
सोन्याचा हा वर्तमान तु, घे भरुनी ह्रुदयात...


आत्ता जगत असलेल्या क्षणी, योग्या priority ठरवुन त्या प्रमणे निर्णय घेता येण म्हणजे situation accept करणे...


आयुष्यात प्रश्न कोणाला नसतात ?? प्रत्येकालाच आपला प्रश्न सर्वात मोठ्ठा वाटत असतो..एखाद्या पाच वर्षाच्या मुलाला घसरगुंडीची शिडी चढता न येणे हा जगातला सगळ्यात मोठा problem वाटतो..तर एखाद्या गरीब मुलाला १२ च्या निकाला नंतर engineering च्या प्रवेशा पेक्षा पण मोठे काही असु शकते यावर विश्वास नसतो..एखाद्या प्रियकराला प्रेयसी च्या हास्यापेक्षा महत्वाचे असे काहीच नसते किंवा एखाद्या sales वाल्याला त्याची deal ही विश्व वाटु लागते..एकंदरीत ... अवघड परीस्थितीत आपण कोठे कमी पडतो ते ओळखणे आणि त्या प्रमाणे वागणे म्हणजे गोष्ट accept करणे...


केवळ "Yes...I know, I was wrong " किंवा "Yes, I made a mistake" म्हणणे आणि सोडुन देणे म्हणजे accept करणे नव्हे..तर झालेल्या चुकांची जाण ठेऊन स्वतःचे १००% देण्याचा प्रामणिक प्रयत्न करणे म्हणजे accept करणे...


" Accept is not only to agree but to agree and go ahead with a positive approach ".

Monday, July 2, 2007

काहीतरी शक्कल लढवायला हवी ... !!!

हे blogs लिहायला किंवा upload करायला लागल्या पासुन जरा गोची झाली आहे..माझे मित्र तसाही मला flirt म्हणतात..पण मी एकनिष्ट आहे हो..ज्या क्षणी जी मुलगी समोर असते, मझी पुर्ण निष्टा एकट्या तीच्यावरच असते..अगदी तशीच जशी माशीची निष्टा पण एकाच विष्टेवर असते.. ( नाकाला हात नका लाऊ..आमच्या सुर्यवंशी सरांनी शिकवलेले physics लक्षात नसले तरी त्यांचे हे वाक्य मला चांगलेच लक्षात आहे..वा सर..म्हणतात ना..कधी शिकलेले कधी कामाला येते..अस्सो...)


तर मी काय सांगत होतो, पुर्वी कसं सोपं असायचे..एक standard template बनवुन ठेवायचे..प्रत्येक नविन project किंवा proposal ला फक्ता header आणि footer बदलले की झाले..म्हणजे काय..एखादे ठेवणीतले काहीतरी लिहीलेले असायचे..प्रत्येक नविन मुलीला impress करायाला बरे पडायचे..


आपली तर strategy पण ठरलेली होती..एकच standard joke किंवा सुंदर कविता..दिसली मुलागी की मारला joke..दिसली मुलागी की मारला joke..पोरगी पण खुष आणि आपण पण खुष..आणि याच दोन पोरी समोरा-समोर आल्या की मग ’पतली गली जिन्दाबाद’..


पण आता वाट लागली राव..आता अस प्रत्येक मुलीला म्हणताच येत नाही ," हे सुन्दरी , हे सारे मी केवळ तुझ्या आणि तुझ्या साठीच लिहीले आहे .."( पण खरच जीच्या साठी लिहीले आहे तीला तरी खर-खर कळत असेल ना ? I just hope so...)


तर मुळात मुद्दा काय .... काहीतरी शक्कल लढवायला हवी ... !!!