Wednesday, December 15, 2010

माझे "खाण्या" वरचे प्रेम !!!

बर्याच वेळा मित्र एकमेकांशी फोन वर तास भर बोलतात आणि मग सगळ बोलुन झाल्यावर काही विषय उरला नाही की मग "काय ... झालं का जेवण ?" हा प्रश्न विचारतात ... हा प्रश्न आला की समजावे की फोन ठेवण्याची वेळ झाली... मी या गोष्टी बद्दल किंवा या प्रकारा बद्दल जाहीर नाराजी व्यक्त करतो... "जेवण झाले का?" किंवा "आज काय बेत?" या सारख्या interestsing topic पासुन गोष्ट सुरु करण्या ऐवजी शेवट करणे कसे शक्य आहे ?

या गोष्टीचे महत्व हे केवळ "वाढता वाढता वाढे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य आहे तेच लोकं समजु शकतील ... एकंदरीत खादाडीवर अमाप प्रेम असणार्या मझ्या असंख्य बांधवांचा मला पाठींबा आहे असे मी येथे ग्रुहित धरतो... :-)

आता आमचे घारपुरे ... "आज काय बेत?" यावर आठवड्यातुन तीन वेळेस तरी "शिकरण" असेच उत्तर देतात ... मग मी पण तेच ते "खा लेकहो ... शिकरण पोळी खा...मटार उसळ खा" असे बोलुन माझं पु.ल. प्रेम व्यक्त करतो ..... अशा प्रकारे पु. लं. ची आठवण करुन देणारी गोष्ट म्हणजे "खादाडी वरचे प्रेम" याला प्रचंड महत्च प्राप्त व्हयला पाहीजे हे मी अगदी "सिरसम जिल्हा झालाच पाहीजे" या उत्साहात म्हणतो...

एकंदरीत ’खाणे’ या गोष्टीवर माझे प्रचंड प्रेम आहे ते तुमच्या लक्षात आले असेलच... माझी ती gtalk वरची status line तर तुम्हाला माहीत आहेच .... "I am on a see (sea?) food diet ... whenever I see food, I eat" ...तर....मी कधीही खाऊ शकतो..जशी चहाची काही ठरावीक वेळ नसते तशी खाण्याला पण वेळ नसते या मताचा मी ... प्रवास म्हणजे तर माझ्या सारख्या खवय्ये मंडळींना आनंदाची पर्वणीच...आणि आता प्रवासा दरम्यान खाण्या मध्ये तुम्ही Hygiene सारख्या क्षुल्लक गोष्टी आणु नका राव...आता...पाणि पुरी बनवणारा माणुस जितका अस्वछ तितकी पाणि पुरी चविष्ट हा जग मान्य नियम आहे की नाही? त्यामुळे let's not talk about hygiene ....(म्हणल की विंग्रजी शब्दा बद्दल बोलताना एक तरी विंग्रजी वाक्य टाकाव ... :-) )

आता मागच्या India trip मध्ये फक्त २ दिवस होतो औरंगाबाद ला..त्यात सुढ्हा(हा शब्द फार महत्वाचा आहे हा:-) ) तर त्यात सुढ्हा एका रात्री बायकोला घेऊन क्रांती चौकातल्या सगळ्यात कोपर्यातल्या अंधारातल्या पाव-भाजी च्या गाड्यावर पाव-भाजी खायला घेउन गेलो...अंधार नसता तर तीला कळाले असते ना की तो पाव-भाजी वाला कसा आहे ते....छे.... काही केल्या बायको तयार होइना... मी एकटयानेच मिटक्या मारत पाव-भाजी खाल्ली ... बायको ला क्रांती चौकात पाव-भाजी खायला घेऊन जाण्याचे महत्व माझ्या सारखे औरंगाबाद प्रेमीच जाणणार म्हणा.... :-)

एखादा problem असेल तर त्याच्या मुळाशी जायचे आणि तिथेच तो सोडवायचा हा माझा मुळ स्वभाव .. (जरा अति झालं का? ..अहो..आता काय करणार...बाकी कोणी बोलत नाही म्हणुन स्वतःच सांगितले ...असो...) तर...त्या प्रमाणे कधी माझी बायको म्हणाली की डोके दुखत आहे किंवा पोट दुखत आहे तर मी पटकन त्या प्रश्नांच्या मुळाशी जातो आणि तीला सुचवतो की ’तुला भुक लागली असेल’ .... झालं... बायको बाकी सगळे मान्य करेल पण हे मान्य करायला तयारच नाही.... अहो....जगातले इतके मोठे-मोठे problem "खाण्याने" सुटतात ..इथे तर फक्त डोके दुखणे अशी साधी बाब आहे....अस्सो.....

तर मुळ मुद्दा काय ? .. काय ? मुळ असा काही मुद्दाच नाही? ...नसु द्या.....पण एकच महत्वाचे .... खाण्यावर प्रेम करा ... :-)

या विषयावर आपण बोलतच आहोत म्हणुन अठवले .... तुम्ही जर खरच रसिक ’खाणारे’ असाल तर तुम्ही एक funda मान्य कराल ... तो म्हणजे "फुकट ते पौष्टीक" .... ऊगाच काही नाही... ...अहो...... office च्या meetings दरम्यान मिळणारे pizza , buscuit, softdrink पासुन ते पंचतारांकीत होटेल मध्ये होणारे lunch, dinner, BBQ हे सर्व याच प्रकारात मोडतात ..... आपल्याला तर बुवा आवडले असले सगळे ... म्हणजे meetings मधल्या discussion पेक्षा पण खायला काय आहे यावर जर ती meeting किती महत्वाची हे कोणी ठरवत असेल तर मी त्या माणसाचा मना पासुन आदर करतो ..... :-)

चला .... बराच वेळ झाला.... नुसता लिहीतोच आहे.... भुक लगली.... काहीतरी खाऊन येतो... :-)

26 comments:

Ash said...

chan aahe... :) baki tuje doke khanya bhaddhal kay mat aahe... hehehe...thodeshi tujya sarki koti keli(shabdik re)..maja ali vachun :)

Ritu Gajabi said...

Keep eating ! :)

Sandeep Kulkarni said...

chhan masaledar lihile ahes... asech don khanya madhe upashi rahun bharpur lihit ja

Unknown said...

Ahaha....Kranti chowk chi chaat attach jaun khawi watatey... :)

Unknown said...

wa wa wa....well said shardul rao....chalalo mi aajach kranti chowkat :) ......khat rahane ha maza janma sidha hakka ahe :) (mazya prakruti kade baghun he khare watat nasale tari hi khari goshta ahe :) )

well said mate....

Parag said...

Arre khadada...:)
"Jevan zale ka?" is a protocol and you MUST follow it!!! Jevayacha topic nanter tasahi kay discuss karayacha rahta...its a way of ending discussion on a high note :)

Mala watla blogging cha fast chalu ahe tuza...pan tu tar farach "fast" ani "chalu" nighalas...keep it up dude!!!

Devkee said...

mast aahe!!!!! khup chan.....
upasachya divashich khanyavarcha blog vachala.... bhuk lagali...

Devkee said...
This comment has been removed by the author.
Sachin said...

sahi re...pan kranti chowk chi pav-bhaji is overated...MIT Durga jawal try kar :P
btw..BLOG chya comment war LIKE che button asate tar warchi monali chya comment la "LIKE"

trupti said...

1 number lihila ahes re.. masta.. maja ali vachun .. क्रांती चौकात jaun baghayala pahije yevadha kay ahe tya pav bhajit :-) Very good. Keep writing more...

विपीन महाजन said...

sahi re shardul... kranti choukat jaun far divas zale... tuza blog vachu aata aankhi jast homesick vatatay...

Anuj said...

Sahi re shardul... i loved it ... but took me very long to read it as it was in Marathi ... :-) u know my skill level... he he he :-)

Milesh said...

Lai bhaari! Does that sound better than "Nice one, dude!"? Singapore-madhye tar khaanach, khaana asel naa?

PJ said...

एक नंबर शार्दुलराव ! जाऊ तिथे खाऊ हा आपला बाणा आहे :)
बाकी एकदम चविष्ट लेखन केले आहे की आपण ! आम्हाला पण त्या दिवसांची याद आणून दिली :) माझा पण थोडा हातभार :) नंतर तारा पान सेंटर ची पण एक सैर होऊन जायला हरकत नाही ! कसें ?
आणि हो तुझ्या बायको ला सांग..की असं बाहेर खाण्यामुळे पोट दुखत नाही. उलट आपली सहनशक्ती वाढते :P

AmitG said...

haha..sahiii ahe!! Shikran poli khat khat wachayla majjja aali!! :P

prajkta said...

...tondala pani sutle ravvvvvv. aankhi yewoo dee

Milind said...
This comment has been removed by the author.
Milind said...

Aai shappat lai bhuk lagli vachunn....atta jaun tav martoo...
Shardul kharach bhuk lagali yar..

ani ekade US madhe basun vada-pav, pav-bhagi tondala

हेरंब said...

काही वर्षांपूर्वीपर्यंत मी "मी कधीही कुठेही आणि कितीही खाऊ शकतो" असं म्हणायचो त्याची आठवण झाली :) (अर्थात पोटाच्या वाढत्या घेराकडे बघून आता असं म्हणू शकत नाही.. :( )

Unknown said...

Nice one !!!

chal sabudana khicadi khayla.....:) i still miss it....

Priyanka said...

Mast!! as always!! mala 3rd para khup awadala..tuz likhan mala nehami pu la'n warun inspired watat..keep writing n yeah..Happy eating! :)

Shilpa said...

@Prasad: Sahanshakti... :P Jau det.. Indiat pochalya-pochalya pot kharab zala maza November madhe.. Tar mi facta idlis ani dosas khalle ani Shardul cha kay khau ani kay nako zala hota!
@Shardul: Masta! Avadla blog.. :)

Unknown said...

good one.
omlette and bhurji paav haatgadi pan athawali kranti chowk chi.
fauzi,munde mama hahaha. so many places wish to visit again.

Exploring myself said...

खूपच छान लिहिल आहेस!
'खाण्यासाठी जन्म आपुला' या वाक्याशी मी पूर्ण सहमत आहे. मुंबईकर म्हणुन क्रांति चौक एत्यादि जागा मला नवीन आहेत, ब्लॉग आणि अभिप्राय वाचून तिथे यायला नक्कीच आवडेल :P मला मात्र मुंबईचा वड़ापाव आणि भेळपुरी आठवुन तोंडाला पाणी सुटलय :)
-मधुरा

Shilpa said...

Shardul, Chhan lihila aahes Blog... tuza khanyawarcha prem tar mahitich aahe... Pav-Bhaji baddal Prasad chya comment la extend karayacha wichar kela aani khali Shilpa chi comment wachali aani ticha aajari padalyawarcha ewadhasa chehara aathawala... bichari...!!! Pan Shilpa tula ek RAJ KI BAAT sangu ???? Kranti Chaukatala pani pachawnarya manasacha jagat kuthehi kahihi khawun kadhihi pot bighadat nahi....!!!! Try kar ke dekho... :)

Ambarish said...

साष्ट्ांग नमस्कार, फार भारी... एकदम औरंगाबाद ची आठवण आली