Tuesday, March 12, 2013

नावात काय आहे?

बऱ्याच लोकांच्या नावा बद्दल आज बोलायचे आहे .. पण सुरुवात स्वतः पासुन करावी असे म्हणतात ना... चला.. "शार्दुल" .. संस्कूत शब्द ... याचा अर्थ "सिंह" .. आता वाघ का सिंह ही चर्चा पुन्हा कधी .. पण मुळातच गरीब "गाय" किंव "गरीब guy" असा माझा स्वभाव .. पण नाव मात्र शार्दुल.. :-).. अस्सो.. नावात काय आहे म्हणा...

माझा जन्म ज्या दिवशी झाला ना त्या दिवशी भारताने पहिल्यांदा cricket world cup जिंकला होता .. ( btw...कसल भारी वाटत ना असे पहील्यांदा, दुसर्यांदा असे लिहीताना :-) .. अस्सो... या विषयावर पुन्हा कधी.. ) .. तर खुप लोकांनी आई-बाबाना सुचविले होते की मुलाचे नाव "कपिल" ठेवा.. नशिब माझे...Man of the match मोहिंदर अमरनाथ म्हणुन नाव "मोहिंदर" ठेवा असे नाही सुचविले आणि त्याहुन नशिब असे की आई-बाबांनी असे कुणाचे काही ऎकले नाही... Imagine ..मोहिंदर प्रकाश सिरसमकर ... अस्सो....

आता बघा.. माझ्या बहीणीचे नाव आणि बायकोचे नाव एकच.. दोघीही शिल्पा ... शिल्पा म्हणले की पटकन मला "शिल्पा चार चांद लगाये" हे अठवते.. इकडे.. एक टीकली लावते, दुसरी नाही... :-) माझ्या लग्नात सगळेजण मागे लागले होते की बायकोचे नाव बदल.. मी म्हणालो नावात काय आहे? आणि जेव्हा नाव बदलणार नाहीच असे ठामपणे सांगितले तेव्हा बाबांनी पण एक sixer मारुन घेतला - "चला, आता आम्ही म्हणु शकतो की आम्ही लेकीमध्ये आणि सुनेमध्ये फरक करत नाही" .. :-)

चला..एकदा स्वतःला चार शिव्या घातल्या की लोकांना हजार शिव्या घालायला मी मोकळा... त्याचे काय आहे ना, उगाच guilty feeling वगैरे असा काही येत नाही मग...

काय भन्नाट नावं ऎकतो आज काल .. "शुन्या" .. ??? ... आधीच सांगतो की हे मुलीचे नाव आहे... काय बोलणार आता? आता काय आई "plus one" आणि बाबा "minus one" ??? ..काय अरे ? ... "प्रद्युम्न" / "द्रुष्टःद्युम्न" ... ऎकायला ठीक आहे, पण अरे, त्या पोराची काय अवस्था होईल ... कितीतरी वर्ष बिचारा स्वतःचे नाव नीट सांगुच शकणार नाही...आणि मोठा झाल्यावर जर का हा asia-pacific मध्ये काम करायला आला तर ... मी गेल्या पाच वर्षात असा एक पण सिंगापुरकर पाहीला नाही जो माझे नाव व्यवस्थित घेऊ शकेल... याचे काय होईल ? ..अस्सो...

बर्याच वेळेस आपले नाव सरळ सोपे असुन पण काही फायदा नाही हो...आता बघा.. "महेश" .. कीती सोपे आहे म्हणायला...पण Singapore मधील माझ्या जुन्या office मधील एक महाभाग गेली ५ वर्ष याला खुपदा सांगुन देखील त्याला "मकेश" असे म्हणतो.. "अरुंधती" ला "अरुहंती" म्हणतो.. "विजय" ला "विजे" .. "कुमार" ला "कुमा" ..आणि "कौस्तुभ" तर याला बापजन्मी जमणार नाही... अस्सो... या लोकांबद्दल जास्त नको.. त्यांची एक-एक नावं मला म्हणुन दाखवायला सांगितली तर माझी वाट लागेल.. अहो खरच.. मला सांगा.. "Ng" हे काय आडनाव आहे? आजुन एक .. "Ngo" .. ?? कसे उच्चारायचे? .. "Xu Ning" या ताईचे नाव "शी निंग" असे उच्चारायचे तर "Xu Chu" या दादाचे नाव "शु चु" असे म्हणायचे... बरे आहे की "Zhang XuePing" याला सगळे XP असे म्हणतात.. आता याचा उच्चार "झ्यांग झुपिंग" नसुन "शांग शेपिंग" आहे हे कसे कळणार ?... अस्सो....

पंजाबी लोकांची नावं एकदम गमतीदार असतात...परवाच facebook वर पाहीले हे... ह्या लोकांना बहुतेक शाळेत असतानाचा ’जोड्या लावा’हा प्रकार खुप आवडत असेल... हे लोकं काय करतात - गट ’अ’ मध्ये लिहितात - मन, जस, सुख, बल, खुश ... आणि गट ’ब’ मध्ये लिहीतात - प्रीत, मीत, गीत, दीप, विंदर .... झालं.... आता मनात येईल तशा लावा जोड्या... ढिगाने नावे तय्यार ... मनप्रीत, मनमीत, जसप्रीत, जसविंदर, बलदीप, बलविंदर .. पाहीजे ते combination.... आता आपले बाबु लोकं... मला वाटते की ही लोकं नावं पण कहीतरी खाता-खाता ठेवतात.. प्रनोब, अर्नोब, पार्थो ... रसगुल्ला तोंडात ठेऊन म्हणली की बरोब्बर उच्चारली जातात .. आणि आथो आपले गुज्जु भाई.. यांची तर भगवान मा एकदम श्रद्धा छे...म्हणुन .. धर्मेश, जिग्नेश, परेश, कल्पेश...
"संगीथा", "कविथा", "प्रीथी" या दाक्षीणात्य "थ" वाल्या नावांबद्दल तर मी बोलणारत नाहीये.. याचा नुसता विचार जरी केला ना तरी मला तीतकाच राग येतो जीतका toilet seat वर बघीतल्यावर तमाम बायको वर्गाला आप-आपल्या नवर्याचा येतो :-)

मला एकदम "वऱ्हाड .. " मधले ते आठवले .. "नाव कशी असतात? कलवती, मैनावती, चंपावती... " .. याच style मध्ये मला वाटत की आमच्या बाबांचा एक काळ होता जेव्हा नावं होती - अरुण, अशोक, वसंत ... नंतर आमचा काळ आला, नावं झाली - अमित, राहुल, आनंद... आता पुढचा काळ... आता काय trend येतोय.. देव जाणे.... !!!

21 comments:

Arundhati Deshmukh said...

Aruhanti here!..it was such fun hearing all those weird forms of names..Jeetika, Kaushi.. Shardoo!

deepali kulkarni said...

maja ali wachayla... amache adnaw tar "cool" "Car" "ni" asech mhantat... ani warun wichartat " Cool Car huh..." :P

Neha Moroney said...

Haha., masta!
Atacha kaal lahan navancha asawaa! Ghet nai ta sampla :) Kivha naav aikala ki ekhadya film actor / actress cha asawa asa watata..
Darsh., arsh.,aisha., taisha., :P

Neha Moroney said...

Haha., masta!
Atacha kaal lahan navancha asawaa! Ghet nai ta sampla :) Kivha naav aikala ki ekhadya film actor / actress cha asawa asa watata..
Darsh., arsh.,aisha., taisha., :P

Shraddha said...

kaalach fb var punjabi navancha vachla!!.. good one :)

Sagar said...

झकास विषय निवडलास..... माझे काही अनुभव:
बंगाली: Adri Guha: आॅद्री गुहो (अद्री गुहा म्हणलेलं त्याला चालायचं नाही)
Irish: Niamh: निव्ह, Bridin: िब्रजीन
एका मित्राला त्याच्या मुलीचं नाँव जगदंबा ठेवायचं होतं - त्याची खूप समजुत काढावी लागली. एका मित्राला होणा-या मुलाचं नांव निर्वाण ठेवायचं आहे (मला ते पार्थिव एवढंच खटकतं)
माझं स्वतःचं संपूर्ण नांव योग्य प्रकारे कसं उच्चारायचं ह्याचा क्लास मी प्रत्येक नवीन ओळख झालेल्या माणसासाठी घेत असतो. गोरे लोक पटकन शिकतात (spelling सकट) पण माझ्या अडनांवाचा समस्त भारतवासियांनी प्रचंड गोंधळ घातलेला आहे. UK मध्ये सुरूवातीला spelling सांगून पण उच्चारामुळे गोंधळ उडालेला आहे. एकदा पल्लवीला P/D, J/Aच्या उच्चार साधर्म्यामुळे Dallavi Jakolkar ह्या नांवाने पत्र आलेलं आहे. तेंव्हापासून मी alpha, bravo, Charlie हे phonetic alphabets शिकलो. बरीच लोकं हार मानून नांवंच बदलतात - मला माहीत असलेले jackie (प्राजक्ता), robin (रवींद्रनाथ), venky (वेंकट), subbu (सुब्रमण्यम) वगैरे आहेत.
असो- शेवटी नांवात काय आहे असं विनोबा भावे म्हणाले होते.

Sagar said...

एका मित्राच्या मुलीचंं सारा हे नांव छोटं वाटतं म्हणून मी तिला गेली अनेक वर्ष व-हाड़ style सारावती असंच हाक मारतो :)

Parag said...

:) Sahi re Sardul :P.
Atach kahi velapurvi me ek flex baghitlala..marathi madhe tyat Arundati(missing h) ase lihile hote ani ani photo madhe "ti" nakkich "Arund" navhti :)

Shilpa said...

sahi shardul...khupach maja aali wachayala......!!!

Awaghad nawanbaddal dada aajobancha "Drushtyudhyumna Pradhyumnacharya Tadsa" cha kissa aathawala...

ek kissa - american lokana aapali nawa nit gheta yet nahit mhanoon eka mitrane tyachya mulache naw Ocean thewale aahe..

Shilpa said...
This comment has been removed by the author.
Shilpa said...

but there is one point I disagree...tu... aani... GARIB GAAY/GUY..???? Hyachyawar PAKSHI tari wishwas thewel ka?? (Prashant Damle/Vandana Gupte style)

Shardul said...

Thanks Aru.. Yeah.. how can I forget Jeetika and Kaushi :-)

@ Deepali .. he he..

@ Neha..thanks.. yeah.. Hritik naw tyamulech tar aahe...purvi HRUTWIK asayache..

@ Sagar ... bhau... tu lihayala lag yaar...seriously... :-) ..are mala PARTHIV baddal lihayacha hota.. kasa kay wisaralo...

@ Parag.. :-) sau sonar ki ek lauhar ki..

@ Shilpa tai... yup... Dadancha kissa athawato na.. ani yes.. mi garibach aahe..

Priyanka said...

Mastch! Vishay, majkur, shaili saglach mast.

Mala Bianca mhanun olakhanare barech aahet. :) On the other hand a firang waitress once asked me if I knew that my name means "favorite" :)

Vichitra navancha tar sukal aahe aaj kal. I don't understand why new parents want their kids name to be unique. Heard names like Kahaan, Naksh, vivita and Lavishka. Dhanya aahet.

Baki dhamaal aali wachun! Keep it coming. :)

Kedar said...

अतिशय कडक रित्या जमलय ... थोडक्यात काय ? "नाव" ठेवायला "नावा"पुरतीही जागा नाही बा !!

Bipin said...

शार्दुल एकदम कडक लेख !!! विचार कर जर तुझ्या या लेखा बद्दल तुला "ज्ञानपीठ" किंवा "साहित्य रत्न" असा काही पुरस्कार मिळाला तर तुझे सिगापूर चे कलीग ऑफिस मध्ये सत्कार करताना कसा उच्चार करतील पुरस्काराचा !!!

तसेच १९८३ world Cup च्या वेळेस सगळ्यात फेवरीट " K श्रीकांत " होता , त्या मूळे कदाचित तुझे नाव " क्रीश्न्नाम्माचारी प्रकाश सिर्सम्कर " पण झाले असते,

Ajay Nichit said...

Kay Sangata rao Navat Kay aahe mhanun..Mag tumhi Ektatai (Kapooranchi ho) sarakhe 'S "Aksharachya mage ka lagala aahat..Nav Shardul Aadnav Sirsamkar Bayako/Bahiniche Nav- Shipla H.Mu.-Singapore,Jababdari Kuthali regionchi tar-South Korea..Aani barich list aahe..Aata Sangat nahi..Shodh mhanje sapadel..Sod te baki lekh matra Surekh aahe..Shiiit..Mala pan tuza S cha rog lagala.. aata sampvato..Sukhi raha..See you..

Sachin said...

Ek number mitra....pudhchya peedhi saathi mast naav suchvato tula...if its baby boy then "Bharatratna"...mhanje sagle tyala "Bharatratna shardul sirsamkar" mhanatil :P...with same logic...mulgi asel tar "padmashri"....Trolling to government :D

Shardul said...

Thank you all !

@ Priyanka .. ha wishay tuzyashi bolatanach suchala hota :-) so special thanks to you :-)

@ Kedar ... shabdanchi koti awadali

@ Bipin Dada ... amachya kade facta order anali tarach satkar hoto...anyatha "wishesh" satkar hoto.. tyamule..dyanpith kay kahihi milale tari ekade he kola mala "Shaddu" asech mhananar :-)

@Ajay ... tounge twister mhanun waparayache ka he ? :-) Awadalay

@ Sachin... he bhari aahe... yacha kharach wichar karu shakato :-) :-)

Exploring myself said...

Me ekach goshta mhanu shakate.. bhannat wara he naw atyanta saarth ahe!! :)

Kedar Palshikar said...

Shardul ha vishay jo tu mandala aahes toh mazha pan khup jivhalayacha aahe hey tula vegale sangayachi garaj nahi....... hya pech prasangatun me pan 2 mahinyan purvi gelo hoto..... ani me itaka vaitagalo ki vatale chintya, pintya asech kahitari naav thevave ki navachi vaat lagali tari behattar......... aaso...... :).....
Pan Nava baddalachi nautanki zhakas aahe...... :) :)

Abhijeet said...

Ha ha, Hilarious. Never paid attention with this perspective.